‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या सेलिब्रिटींची तापसी पन्नूने केली बोलती बंद, म्हणाली…

मुंबई | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी गेल्या ७० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे. याबाबत पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर भारतात ट्विटर वॉर रंगले. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स यांनी सरकारच्या समर्थानार्थ ट्विट केले. मात्र अभिनेत्री तापसी पन्नूने या सर्वांना फटकारले आहे.

पॉपस्टार रिहानाने भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तिने आंदोलनासंबंधी एक बातमी शेअर करत ‘आपण यावर का बोलत नाही’ असा सवाल केला. या बातमीत शेतकऱ्यांसाठी बंद केलेली इंटरनेट सेवा आणि पोलीस आणि शेतकऱ्यांच्यात होत असलेल्या संघर्षाचा उल्लेख केला आहे. तिने #FarmersProtest असा हॅशटॅग वापरला आहे.

दरम्यन, रिहानाला उत्तर देताना भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले. यामध्ये त्यांनी #IndiaTogether, #IndiaAgainstPropaganda हे हॅशटॅग वापरले. यानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरनेही, लता मंगेशकर, विराट कोहली तसेच अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी #IndiaTogether, #IndiaAgainstPropaganda  याच हॅशटॅगचा वापरत करत ट्विट केले आहेत. यानंतर सोशल मीडियावर चांगलेच ट्विट वॉर रंगले.

शेतकरी आंदोलनावर दोन महिन्यानंतर सेलिब्रिटींनी घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांच्या टीका केली जात आहे. अशात अभिनेत्री तापसी पन्नू हिने सेलिब्रिटींच्या या मतावर चपराक मारली आहे.

ती म्हणते, ‘’जर एखादे ट्विट आपल्या ऐक्याला त्रास देत असेल, एखादा विनोद तुमचा विश्वास गमावत असेल किंवा एखादा शो तुमच्या धार्मिक श्रद्धेला तडा देईल. तर, तुम्हालाच तुम्हीच मुल्यप्रणाली आणखी ताकतवान बनवण्यासाठी कार्य केले पाहिजे. मग, इतरांसाठी ते ‘प्रोपगंडा टीचर’ बनणार नाही’’

दरम्यान, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाह्य शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया. असे ट्विट सचिन तेंडुलकर यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकर, विराट कोहली मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात
कंगना पुन्हा बरळली; भारतीय क्रिकेटर्संना म्हणाली धोबी का कुत्ता
पॉर्न स्टार मिया खलिफा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा फोटो पोस्ट करुन म्हणतीये….
व्हा गुंतवणुकदार! अमित शहांनी ‘या’ योजनेत गुंतवले लाखो रुपये, जाणून घ्या फायदा आणि व्याजदार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.