तंत्रज्ञानाच्या जोरावर आता अशक्य वाटणारी कामे देखील सहज शक्य झाली आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करुन असेच एक अशक्य वाटणारे काम शिर्डी संस्थानच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी करुन दाखवले आहे. गाठ काढून टाकण्याची एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. परंतू डॉक्टर आणि सुईला लहान मुलं घाबरत असता. शिर्डीत झालेल्या शस्त्रक्रियेत त्या चिमुकल्याच्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमी आहे.
भूल न देताच लिंबाच्या आकाराची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया शिर्डी संस्थानातल्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी यशस्वी करून दाखवली आहे. न्युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी व भुलतज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांनी हे काम करून दाखवले आहे. नऊ वर्षाच्या गणेश गोरख पवार या मुलावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गणेश याला फिट येत असल्यामुळे त्याचे पालक शिर्डीतील रुग्णालयात त्याला घेऊन आले होते. मुलाच्या उजव्या मोठ्या मेंदुत गाठ असल्याचे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर समोर आले. ही गाठ ज्या ठिकाणी होती त्या भागातून डाव्या पाय आणि हाताच्या नसा कार्यरत होत्या. या कारणास्तव जर शस्त्रक्रियेदरम्यान इजा झाली तर अर्धांगवायू होण्याची शक्यता होती.
अशी सगळी परिस्थिती बघता गणेशला भुल न देता शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. या परिस्थितीची सबंध माहिती रुग्ण गणेश आणि त्याच्या पालकांना देण्यात आली. गणेशने वेदना सहन करण्यास होकार दर्शवला. तसे बघता हे इतके सोपे नव्हते. डॉ. मुकुंद चौधरी यांचा अनुभव आणि प्रदीर्घ प्रशिक्षण असले तरी नऊ वर्षाच्या गणेशला भुल न देताही ऑपरेशन करणे आव्हानात्मक होते.
वरिष्ठ भुलतज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांच्या प्रदिर्घ अनुभवामुळेही पुढील प्रक्रिया शक्य झाली. त्यांच्याशी बोलल्यानंतर भुल न देताच शस्त्रक्रिया करण्याची तयारी दाखवता २६ डिसेंबरला शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. शस्त्रक्रिये दरम्यान मुलाशी बोलत, त्याच्या हातापायाला कुठलीच दुखापत न होऊ देता साधारन दिड तासात ऑपरेशन झाले. ऑपरेशन दरम्यान गणेश जागाच होता आणि ऑपरेशनच्या वेळी वेदना न झाल्यामुळे हाता पायांची पुन्हा पुन्हा तपासणी करणे शक्य झाले.
शिर्डी संस्थानातल्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया मोफत झाली असुन महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करता येतात. शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाल्यामुळे संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक व उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे या सगळ्यांनी संपूर्ण टिमचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या
शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर; तीन जण ताब्यात
समृद्धीवर वेगाच्या थरारात भीषण अपघात; तब्बल चार पलट्या मारत गाडी रस्त्याच्या पलीकडे, गाडीतील सहा जण…
ऋषभ पंतला मृत्यूपासून वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरला मिळाले हे बक्षीस, त्यांनी सांगितली संपूर्ण घटना