“राज्यावर संकट असताना अमृता फडणवीस यांना शेरोशायरी सुचते, यामुळे त्यांची सत्तेची लासला दिसून येते”

मुंबई । २०१९ मध्ये राज्य सरकार बदलले, राज्यात भाजपची सत्ता जाऊन महाविकास आघाडीची सत्ता आली. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली.

अनेकदा त्यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. यामुळे त्या सतत चर्चेत असतात. तसेच त्या विविध गाण्यांमधून देखील लोकांच्या भेटीला येतात. त्याच्या गण्यावरून देखील अनेकदा त्यांना ट्रोल केले गेले आहे. यामुळे अनेकदा वाद निर्माण झाला आहे. आता देखील अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमुळे नवीन वाद सुरु झाला आहे.

आता राज्यावर तौक्ते चक्रीवादळाचे संकट आले आहे. असे असताना अमृता फडणवीस संवेदनशीलपणा दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करतात. यामधून त्यांना असणारी सत्तेची लालसा दिसून येते. अशी टीका आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली आहे.

संकटकाळात अशाप्रकारे वागणे योग्य नाही, आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झाले नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करतात.

अशी टीका आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. अमृता फडणवीस यांनी ‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है! असे म्हटले होते. यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

या ट्विटवरून अनेक अर्थ काढले जात आहेत. या वादळाचे राज्याच्या राजकारणात काय परिणाम होणार का.? तसेच महाराष्ट्रात लवकरच राजकीय घडामोडी होणार का.? असे अनेक प्रश्न यावरून उपस्थित केले जात आहेत.

ताज्या बातम्या

मित्राने सांगीतले राॅकेल पिल्यावर कोरोना जातो, मित्राचे ऐकले व गमावला जीव; मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटीव्ह आला

कलेक्टरने सोनू सूदच्या मदतीचा दावा फेटाळला, सोनूने थेट पुरावाच दाखवला

सोनू सूदच्या मदतीवर कलेक्टरने व्यक्त केला संशय; सोनूने थेट पुरावेच फेकले तोंडावर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.