म्युकर मायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला; नितीन गडकरींची मोठी घोषणा

वर्धा । गेल्या वर्षभरापासून आपला देश कोरोनाशी दोन हात करत आहे. असे असताना अजून एका आजाराने थैमान घातले आहे. हा आजार म्हणजे म्युकर मायकोसिस. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.

यावर औषध उपलब्ध होत नसल्याने समस्या वाढत आहेत. यासाठी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुढाकार घेऊन वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती होणार आहे. यामुळे ही एक दिलासादायक बाब आहे. यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासाठी मदत होणार आहे.

सध्या देशात काही राज्यांमध्ये म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरातचा समावेश आहे. यामुळे आता वर्ध्यात या आजारावरील इंजेक्शन्सची निर्मिती होणार आहे.

याबाबत यावरील एक इंजेक्शन ७ हजार रुपयांना मिळतं. एका रुग्णाला ४० ते ५० इंजेक्शन्स दिली जात आहेत. त्यामुळे ही इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत नाहीत. वर्ध्यात तयार होणारे इंजेक्शन १२०० रुपयांत मिळेल. एका दिवसात २० हजार इंजेक्शनची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती गडकरींच्या कार्यालयाने दिली आहे.

वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी ही कंपनी हे इंजेक्शन तयार करणार आहे. या कंपनीला राज्याने परवानगी दिली आहे. पुढील १५ दिवसांत कंपनी इंजेक्शनचे उत्पादन सुरू करेल. यामध्ये नितीन गडकरींनी मोलाची भूमिका बजावली आहे.

म्युकर मायकोसिसचे रुग्ण दिवसेंदिवस आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जर रुग्ण वाढले तर इंजेक्शनची कमतरता भासणार नाही. कोरोना काळात रेमडेसीवीर इंजेक्शनची मोठी कमतरता भासू लागली होती. यामुळे अनेकांचे मृत्यू देखील झाले.

ताज्या बातम्या

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्तीचा जीन्स वरील डान्स बघून तुम्ही व्हाल घायाळ

‘मेरे सैंया सुपरस्टार’ गाण्यावर डान्स केलेल्या त्या नवरीचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल

उत्तरप्रदेशात कोरोना चाचण्या निगेटीव्ह येण्यामागे आहे सरकारचा हा ‘झोल’; वाचून तुम्हीही हादराल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.