एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले

बॉलीवूडमध्ये अनेक प्रकारचे चित्रपट बनतात. त्यातले काही चित्रपट खुप हिट होता. तर काही चित्रपटांच्या कहाण्या खुप हिट होतात. म्हणून आपण आयुष्यात काही वेगळी घटना घडली तर किती फिल्मी स्टोरी आहे अस बोलतो.

आज आपण बॉलीवूडच्या एका अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याच्या आयुष्यातील एका घटनेमुळे त्याचे आयुष्य खराब झाले. ती घटना आपल्याला खुप फिल्मी वाटेल. पण ती खरी आहे. एका रात्रीत या अभिनेत्याचे सगळे कुटुंब उध्वस्त झाले.

या अभिनेत्याचे नाव आहे कमल सदाना. कमल सदानाने बॉलीवूडमध्ये खुप चांगली एन्ट्री केली होती. पण नंतर मात्र एका घटनेने त्यांचे सगळे आयुष्य बदलून गेले. कमल त्या एका घटनेनंतर खुप दिवस शॉकमध्ये होता.

कमल सदानाचे वडील ब्रिज सदाने बॉलीवूड निर्माते होते. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. कमल सदानाची आई सहीदा अभिनेत्री होत्या. कमलला एक छोटी बहीण होती. कमल सदाना आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहत होते.कमल सदानाचे वडील खुप फ्रेंडली होते. पण ज्यावेळेस ते ड्रिंक करायचे. त्या वेळेस मात्र ते पुर्णपणे बदलून जायचे. याच गोष्टीमूळे त्यांच्या आई वडिलांमध्ये नेहमी भांडण व्हायची. कारण ते खुप जास्त ड्रिंक करायचे.

या गोष्टीमूळे त्यांच्या घरात नेहमी तणाव असायचा. त्यांच्या वडिलांनी आवड म्हणून एक गन खरेदी केली होती. पण पुढे जाऊन ही गन त्यांच्या कुटुंबासाठी खुप मोठी मुसीबत बनली आणि त्यांचे पुर्ण कुटुंब बरबाद झाले.

कमल सदानाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ते दहा वर्षांचे होते. तेव्हा त्यांच्या आई वडिलांमध्ये भांडण झाले होते. त्या दिवशी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांनी गनने त्यांच्या आईला घाबरवले आणि हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर त्यांचे कुटुंब खुप जास्त घाबरले होते.

त्यामूळे त्यांच्या आई वडिलांमध्ये खुप मोठे भांडण झाले होते. दहा वर्षांनंतर कमल सदानाचा २० वा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांच्या घरात खुप जास्त आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या वाढदिवसाची छोटीशी पार्टी होती.

या पार्टीमध्ये कलम सदानाच्या वडिलांनी खुप जास्त ड्रिंक केले होते. त्यांना काहीही कळत नव्हते. या अवस्थेत त्यांच्या आई वडिलांमध्ये भांडण सुरू झाले. म्हणून कमळ सदाना त्यांच्या रूममध्ये गेले आणि दरवाजा लावून घेतला.

थोड्या वेळाने त्यांना बाहेरून गोळी चलण्याचा आवाज आला. ते पळत रूमच्या बाहेर गेले आणि त्यांना धक्का बसला. कमल सदानाची आई आणि बहीण रक्तबंबाळ झाल्या होत्या. त्यांच्या वडिलांना हे सगळे काही केले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर देखील एक गोळी चालवली.

पण ही गोळी त्यांच्या कानाला लागून गेली. कमल सदाना जखमी झाले. त्यांनी तुरंत हॉस्पिटलमध्ये फोन केला. कमल सदाने हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि सकाळी ४ वाजता ते परत घरी आले. तेव्हा त्यांना काही कळत नव्हते.

कारण त्यांच्या वडिलांनी स्वतः देखील गोळी मारून घेतली होती. त्यांच्या आईचा बहिणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वडिलांनी स्वतः ला गोळी मारून घेतली होती. काही तासांमध्ये त्यांचे पुर्ण कुटुंब संपले होते.
या घटनेनंतर कमल सदानाने काही दिवस हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली. कारण या सर्वांचा त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता. ते खुप एकटे झाले होते. त्याच या जगात कोणीही राहील नव्हते.

खुप प्रयत्न केल्यानंतर कमल सदाना नॉर्मल झाले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवस बॉलीवूडमध्ये काम केले. त्यांनी कजोलसोबत बेखुदी आणि दिव्या भारतीसोबत रंग चित्रपटामध्ये काम केले. पण त्यांना काही खास यश मिळाले नाही. त्यामूळे त्यांनी अभिनय सोडला आणि निर्मिती क्षेत्रात गेले.

पण तिथेही त्यांना जास्त यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी स्वतः चा व्यवसाय सुरू केला. त्यांनी लिसासोबत लग्न केले आहे. आज ते त्यांच्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबासाठी खुप महत्त्व आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्याने लढवली भन्नाट शक्कल! आता कमवतोय एकरी ३ ते ४ लाखांचे उत्पन्न
टाटांचा धमाका! फक्त ७९९ रूपयांच्या हप्त्यावर देणार गाडी; जाणून घ्या पुर्ण स्किम..
स्कॉर्पिओ लव्हरने घरावरच बांधली स्कॉर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी, आनंद महिंद्रा म्हणतात..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.