तामिळनाडूच्या तंजावर(Tanjavar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीला गर्भवती केल्याच्या प्रकरणात १२ वर्षीय मुलाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलगी या दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(Crime against a 12-year-old boy for making a 17-year-old girl pregnant, find out the whole case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलीने राजा मिरसुदार शासकीय रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला आहे. या अल्पवयीन मुलीचे काही वर्षांपासून १२ वर्षीय मुलाशी प्रेमसंबंध होते. यामुळे मुलगी गरोदर राहिली होती. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाला पॉस्को कायद्यांतर्गत अटक केली आहे.
तसेच आरोपी मुलाला तंजावर बाल सुधारगृहात पाठवले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. काही महिन्यांपूर्वी पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर मुलीच्या पालकांनी तिला राजा मीरासुदार शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पालकांना मुलगी गरोदर असल्याची माहिती मिळाली.
रुग्णालयाकडून पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तंजावर पोलिसांकडून अल्पवयीन मुलीची चौकशी करण्यात आली होती. यानंतर १२ वर्षीय मुलाविरोधात पोक्सो कायद्याच्या दोन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर कडक कारवाई करत तंजावर पोलिसांनी १२ वर्षीय मुलाला अटक केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पॉस्को कायद्यानुसार अल्पवयीन म्हणजेच १८ वर्षांखालील मुलांसोबत कोणत्याही प्रकारचे लैंगिक वर्तन केल्यास या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होतो. अल्पवयीन मुलांना शारीरिक आणि लैंगिक शोषणापासून सामान सरंक्षण देण्यासाठी या कायदयाची रचना करण्यात आली आहे. पॉस्को कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या खटल्यांची सुनावणी विशेष न्यायालयात करण्यात येते.
पॉस्को कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या खटल्यांची सुनावणी पालकांच्या उपस्थितीत आणि कॅमेऱ्यासमोर करण्यात येते. या कायद्यांतर्गत एका वर्षाच्या आत खटला पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अल्पवयीन मुलाशी त्याच्या संमतीने जरी संबंध ठेवण्यात आले असतील, तरी देखील त्याला पॉस्को कायदयानुसार बलात्कार असेच ग्राह्य धरले जाते.
महत्वाच्या बातम्या :-
“एकटे जाणाऱ्या व्यक्तीच्या गाडीवर हल्ला करताय तुम्ही सुद्धा गाडीने एकटे जाणार आहात हे लक्षात ठेवा”
दोन्ही लाजिरवाणे विक्रम बंगलोरच्याच नावावर, आज पुन्हा फक्त 68 धावांवर झाले ऑलआऊट
…अन्यथा मी स्वत: राणांना बाहेर काढण्यासाठी जाईल; नारायण राणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया