छतावर स्विमींग पूल, मिनी थिएटर; वाचा काय काय सुविधा आहेत सचिनच्या ८० कोटींच्या अलिशान बंगल्यात

आज आपण ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांच्या घराविषयी जाणून घेणार आहोत. अफाट मेहनत आणि इच्छा यांच्या जोरावर आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो हेच खर. क्रिकेटच्या दुनियेतील देवमाणूस आणि क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्याविषयी चाहत्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता आणि आदर पाहायला मिळतो.

सचिन तेंडूलकर जेवढे आपल्या क्रिकेट संघाशी कर्तव्य निष्ठ आहेत तेवढेच ते त्यांच्या आयुष्यात कुटुंबाप्रती कर्तव्य निष्ठ आहेत. आजही त्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो. सचिन आपल्या भव्य मेन्शन मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. आज आपण त्यांच्या भव्य बंगल्याविषयी जाणून घेणार आहोत.

सचिन तेंडूलकर यांनी पश्चिम वांद्रेच्या पॅरी क्रॉस रोडवर एका पारसी कुटुंबाकडून ८९०० चौरस फूट बंगला ४० करोडला विकत घेतला नंतर त्यांनी त्या बंगल्याच्या नवनिर्मितीसाठी ३९ करोड खर्च केले. अश्याप्रकारे  त्यांच्या घराची लगभग किमत ७९ करोड एवढी आहे. या घराची त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वप्न पहिली होती.

या पाच मजली बंगल्याच्या निर्मितीत सचिनची पत्नी अंजली यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. क्रिकेटमध्ये  व्यस्त असल्यामुळे सचिनला वेळ देता आला नाही पण चार वर्षे अंजली त्याच्या घराची कामे पहात होती. अंजलीनेच घराचे आतील आणि बाह्य डिझाईन केले आणि जाऊन घराची इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केली. समोर बंगल्याचे तीन मजले दिसतात, तर २  मजले मैदानाच्या आत आहेत.

बंगल्यात तळ मजल्यात ४५ ते ५० कारच्या पार्किंगसाठी जागा असेल तर वरच्या मजल्यामध्ये अत्याधुनिक स्वयंपाकघर, सर्व्हिंग क्वार्टर आणि सुरक्षा कक्ष आहे. बंगल्याच्या आत आणि बाहेरील सीसी टीव्ही कॅमेरे आहेत, ज्याद्वारे त्यांना कोठे काय चालू आहे याची माहिती कळते.

तळ मजल्यावर एक ड्रॉईंग हॉल, जेवणाचे खोली, गणेशाचे मंदिर आणि जगभरातील सर्व बक्षिसे, पदके, ट्रॉफी सजवण्यासाठी एक मोठ कपाट आहे. ड्रॉईंग रूममध्ये एक मोठा टीव्ही देखील आहे जेणेकरुन सचिनचे कुटुंब किंवा पाहुणे त्याचा आनंद लुटू शकतील. घरात दोन मोठ्या खोल्या आहेत आणि पहिल्या मजल्यावरच अतिथींना बसण्यासाठी सोपा आहे.

दुसरा मजला सचिनने त्याच्या दोन्ही मुलांसाठी ठेवला आहे. मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा येथे राहतील. मुलांच्या जगात कोणतीही लुडबुड नको म्हणून सचिन आणि अंजलीचा मास्टर बेडरूम तिसऱ्या मजल्यावर आहे. संपूर्ण बंगल्यात आवश्यकतेनुसार जगातील सर्वोत्तम गोष्टी आहेत. त्याचं  स्वयंपाकघरही अत्याधुनिक आहे.

सचिनला चित्रपट पाहण्याची फार आवड आहे, त्यामुळे बंगल्यात एक मिनी थिएटरही बांधले गेले आहे. तिथे सचिन आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह चित्रपटांचा आनंद घेतो. एवढेच नाही तर बंगल्याच्या छतावर स्विमिंग पूलही बनविला गेला आहे, तिथे पोहण्याचा आनद घेता येतो. अश्याप्रकारे सचिन तेंदुलकर यांचे अतिशय सुंदर आणि भव्य असे घर आहे.

हे ही वाचा-

पाॅझीटीव्ह बातमी: ११ जणांच्या कुटुंबातील सर्वांना कोरोना; ‘अशी’ केली घरच्या घरी कोरोनावर मात

भारताच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या मोठ्या व्यक्तिने राजकारणाला ठोकला रामराम

रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेताचा खेळ खल्लास; अखेर सत्याचाच होणार विजय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.