‘या’ भारतीय संघातील खेळाडूंनी केलंय आधी लग्न झालेल्या महिलांसोबत लग्न, वाचून धक्का बसेल

आज आम्ही तुम्हाला असे काही भारतीय संघातील खेळाडू सांगणार आहोत ज्यांनी आधीच एक लग्न झालेल्या म्हणजे घटस्फोट घेतलेल्या महिलांसोबत लग्न केले आहे. यामध्ये एक असा खेळाडू पण ज्याने आपल्या मित्राच्या बायकोसोबत लग्न केले आहे.

१) मोहम्मद शमी आणि हसीन झा- हसीन झा हिने मोहम्मद शमीबरोबर दुसरे लग्न केले आहे. पहिल्या पतीकडून हसीन हिला दोन मुली झाल्या ज्या आता १४ आणि १० वर्षांच्या आहेत. तिचे पहिले लग्न २००२ मध्ये झाले होते आणि २०१० मध्ये तिचा घटस्फोट झाला.

मोहम्मद शमी आणि हसीन हे पहिल्यांदा २०१२ च्या आयपीएलमध्ये भेटले होते. तेव्हा हसीन झा हिने चिअर लिडिंगचं काम केलं होतं. २०१४ मध्ये दोघांनी लग्न केले. त्या दोघांना एक मुलगी झाली आणि आता त्यांना तीन मुली आहेत.

२) शिखर धवन आणि आयशा मुखर्जी- आयशा आणि हरभजन सिंह हे फेसबुकवर मित्र होते. त्यानंतर शिखर धवनने हरभजनला आयशाबद्दल विचारले आणि भेटायचा हट्ट केला. त्यानंतर शिखर आणि आयशा हे दोघे चांगले मित्र झाले आणि दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली.

त्यांच्या लग्नाला खूप विरोध झाला कारण आयशा शिखर धवनपेक्षा १० वर्षांनी मोठी होती. आणि तिला आधीच पहिल्या पतीकडून दोन मुले होती. पण धवनने शेवटपर्यंत तिचा साथ सोडला नाही दोघांनी लग्न केले. त्यांना नंतर एक मुलगा झाला.

३) अनिल कुंबळे आणि चेतना- अनिल आणि चेतना यांची लव्हस्टोरी खूप वेगळी आहे. जेव्हा अनिल कुंबळे आणि चेतना यांच्यात प्रेम झाले तेव्हा चेतनाचे आधीच लग्न झाले होते. तिला एक मुलगी होती.

पण तिचे आणि तिच्या पहिल्या पतीचे भांडण होत असे. जेव्हा ती ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कामाला लागली तेव्हा अनिल कुंबळे आणि तिची भेट झाली. पुढे ते भेटतच राहिले व त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. सध्या त्यांना तीन मुले आहेत.

४) मुरली विजय आणि निकिता बंजारा- सगळ्यात वेगळी लव्हस्टोरी असणारे कपल म्हणजे मुरली विजय आणि निकिता. कारण मुरली विजयने स्वतःच्या मित्राच्या पत्नीसोबत लग्न केले आहे. हा खूप विवादास्पद प्रेमविवाह आहे. मुरली विजय याला दिनेश कार्तिकच्या पत्नीवर प्रेम झाले होते.

मुरली विजय दिनेश कार्तिकचा लहानपणीचा मित्र आहे. एवढं असूनही त्याने दिनेश कार्तिकच्या पत्नीसोबत लग्न केले आणि आता त्यांना तीन मुले आहेत. दिनेश कार्तिकने २०१५ मध्ये दुसरे लग्न केले. घटस्फोटाच्या वेळी निकिता प्रेग्नेंट होती.

महत्वाच्या बातम्या-

“रश्मी ठाकरे कधीही गाणं म्हणणे, चेहरा बदलणे, वेगवेगळी विधाने करणे यात पडल्या नाहीत”

‘या’ नेत्यामुळे गोपीनाथ मुंडे सोडणार होते भाजप; मात्र बाळासाहेबांच्या भेटीनंतर निर्णय घेतला मागे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.