भारताच्या प्रसिद्ध फिरकी गोलंदाजाचे अवघ्या ३६ व्या वर्षी कोरोनाने निधन

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर अनेक रुग्णांचा मृत्यु होत आहे, कोरोनामुळे अनेक कलाकार,खेळाडू आपला जीव गमावत आहे.

अशाचत क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानचा प्रसिद्ध स्पिनर विवेक यादव यांचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे.

गेल्या काही काळापासून त्यांचा लिव्ह कॅन्सर झाला होता, कॅन्सरशी संघर्ष सुरु असतानाच त्यांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यानंतर त्यांना जयपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांना मृत्यु झाला आहे.

विवेक यांच्या निधनांतर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि आयपीएल २०२१ चे कॉमेंटेटर आकाश चोपडा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. राजस्थानचे रणजी प्लेयर आणि माझा खास मित्र विवेक यादव यांचे निधन झाले आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. भावपुर्ण श्रद्धांजली, असे आकाश चोपडा यांनी म्हटले आहे.

विवेक यांनी आपल्या क्रिकेटची सुरुवात प्रथम श्रेणी क्लासमधून राजस्थानकडून खेळण्यास सुरुवात केली होती. विवेक त्या संघातही होते, ज्या संघाने २०११ ची रणजी ट्रॉफी जिंकली होती.

विवेकने २०११ च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शानदार प्रदर्शन करत ४ विकेट घेतल्या होत्या. त्याच्या रणजी सामन्याचे प्रदर्शन पाहून २०१२ मध्ये दिल्ली डेअरडेविल्सने त्याला आयपीएलमध्ये घेतले होते. पण विवेक यांना एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाकाळात गरींबासाठी जॅकलिन फर्नांडिस आली धावून; लाखो लोकांपर्यंत पोहोचवते जेवण, पहा फोटो
..त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक, तज्ञांनी सांगितले धक्कादायक कारण
VIDEO: पोलिसांसमोर तरुणीचा भररस्त्यात ड्रामा; मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनाही सुनावले खडे बोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.