बडोदा(Badoda) आणि चंदीगड(Chandigad) यांच्यातील रणजी करंडक स्पर्धेच्या सामन्यात एका क्रिकेटपटूने आपल्या समर्पण आणि जिद्दीने सर्वांना प्रभावित केले आहे. बडोद्याचा फलंदाज विष्णू सोलंकी याने मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर मैदानावर उतरत शतक झळकावले आहे. त्याने चंदीगड विरुद्धच्या सामन्यात १६१ चेंडूत १०३ धावांची(Runs) शानदार खेळी केली आहे.(cricketer vishnu solanki played match after daughter funeral)
यासाठी देशातील लोक विष्णू सोलंकी यांना सलाम करत आहेत. बडोद्यासाठी रणजी करंडक खेळणाऱ्या विष्णू सोलंकी यांच्याबाबतीतील हा प्रसंग भावुक करणारा आहे. विष्णू सोलंकी यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. पण अशा भावुक क्षणीही विष्णू सोलंकी याने सामना खेळण्याचा निर्णय घेतला.
मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर तो सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याने शानदार शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीमुळे बडोद्याच्या संघाने ४०० धावांच्या आसपास मजल मारली आहे. यावेळी विष्णू सोलंकी याने पिता आणि क्रिकेटपटूची भूमिका निभावली. त्याचा या रणजी मोसमातील हा पहिलाच सामना होता.
११ फेब्रुवारी रोजी विष्णू सोलंकीला कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे विष्णू सोलंकीच्या घरात आनंदाचे वातावरण होते. पण हा आनंद त्यांच्या घरात फार काळ टिकला नाही. त्याच्या नवजात मुलीचे २४ तासांमध्येच निधन झाले. विष्णू सोलंकीला नवजात मुलीच्या मृत्यूची दुःखद वार्ता समजली. तेव्हा तो संघासोबत होता.
त्यानंतर विष्णू आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी बडोद्यात आला. मुलीचे अंत्यसंस्कार केल्यानंतर तो थेट सामना खेळायला गेला. त्याने या सामन्यात उत्कृष्ट खेळी करत शतक झळकावले आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. विष्णू सोलंकी याने या सामन्यात १६१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली आहे. या डावात त्याने आतापर्यंत १२ चौकार मारले असून ६३.९८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
असाच काहीसा प्रकार भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बाबतीत घडला होता. एका रणजी सामन्यात तो दिल्ली संघाकडून खेळत होता आणि त्याच्या संघाला पराभवाचा धोका होता. अशा स्थितीत विराटच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. अशा दुःखद क्षणी देखील विराट फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. विराटने सुरेख अर्धशतक झळकावून संघाला पराभवापासून वाचवले होते.
महत्वाच्या बातम्या :-
टीना अंबानींच्या मुलाच्या लग्नात बच्चन कुटुंबाचीच हवा, महागडे दागिने घालून पोहोचले लग्नात, पहा फोटो
मैत्रिणींसमोर मुलीला ओरडणे पडले चांगलेच महागात; राग डोक्यात घेऊन मुलीने उचलले टोकाचे पाऊल
VIDEO: ‘जो राम को लाएंगे हम उनको लाएंगे’, भाजपला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या पोलिसावर कारवाई