आपल्या फाटक्या शुजचा फोटो क्रिकेटरने शेअर करताच प्युमा क्रिकेटने त्याला केली ही मदत

कोरोनाचा प्रभाव खेळावर आणि खेळाडूंवरही पडत आहे. काही खेळाडू तर नाईलाजाने दुसरे काम करण्यास तयार झाले आहेत. कारण त्यांना खेळातून आता काहीच इनकम मिळत नाहीये. याचदरम्यान झिंम्बाम्वेचा एक क्रिकेटर रेयान बर्लन आपल्या फाटक्या बुटांचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला.

ते यामध्ये आपले फाटलेले शुज चिटकताना दिसत आहेत. त्यामध्ये शुजला चिटकवण्याचा ग्लुही दिसत आहे. तो त्यासोबत असेही म्हणाला की मला कोणीच स्पॉन्सर नाही. जर असे झाले की मला कोणीतरी स्पॉन्सर मिळेल जेणेकरून मला सीरीजनंतर असे शुज चिटकवण्याची गरज पडणार नाही.

काही तासांतच त्यांना मदत मिळाली आणि प्युमा क्रिकेटने त्यांना स्पॉन्सरशिप देण्याचे वचन दिले. प्युमा क्रिकेट एक खेळाशी संबंधित असलेली कंपनी आहे. रेयान बर्लच्या ट्वीटलाच त्यांनी रिप्लाय दिला आणि त्यांना स्पॉन्सर करण्याचेही वचन दिले.

त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल अकाऊंटवरून त्याला रिप्लाय दिला आहे. तुम्हाला ग्लू ठेवायची आता गरज नाही. आम्ही तुम्हाला लवकरच संपर्क करू. बर्लने प्युमाचे आभार मानले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे सध्या क्रिकेट सिरीज आयोजित करण्यात आलेल्या नाहीत.

अशामध्ये झिंम्बाब्वेसारख्या छोट्या देशातील खेळाडूंवर आर्थिक संकट उद्भवले आहे. २७ वर्षांच्या रेयान बर्ल यांनी आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये १८ वनडे आणि २५ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यांनी टेस्टमध्ये २४ रन काढलेले आहेत तसेच चार बळीही घेतले आहेत.

तसेच वनडेमध्ये एक अर्धशतकाच्या मदतीने सगळेमिळून २४३ रन आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३९३ रन बनवले आहेत. त्यांनी वनडेमध्ये ७ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये १५ बळी घेतले आहेत.

महत्वाच्या बातम्या
आईची माया! ऑक्सिजनवर असलेली ती माऊली करतेय स्वयंपाक; फोटो पाहून तुम्ही कराल कौतूक
नही बताती दाम है, हमे तो चूसना आम है! पहिलीच्या या कवितेमुळे सोशल मिडीयावर वाद
VIDEO: कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी डॉक्टरांनी गायलं सुशांतचं गाणं; कोरोना रुग्णही मनसोक्त थिरकले
भुख लागली असेल बिनधास्त खा, पैसे देऊ नका; सोशल मीडियावर तमिळनाडुच्या फळविक्रेत्याची चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.