भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा(Sachin Tendulkar) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने एका मराठी गाण्यावर ठेका धरला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.(cricketer sachin dance on marathi song)
मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना कोलकत्ता नाईट रायडर्सशी होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणार आहे. सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक आहे. या सामन्यासाठी मुंबईहून पुण्याला प्रवास करत असताना सचिन तेंडुलकरचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.
सचिन तेंडुलकर आणि भारताचे माजी खेळाडू किरण मोरे मुंबई इंडियन्सच्या पुढील सामन्यासाठी एका गाडीने मुंबईहून पुण्याला प्रवास करत होते. त्यावेळी गाडीमध्ये ‘मी डोलकर…डोलकर’ हे गाणं लावण्यात आलं होतं. यावर सचिनने हे गाणं गात ठेका धरला. यावेळी सचिनने काही डान्स स्टेप्स देखील केल्या.
सचिनचा हा व्हिडिओ त्याच्या सहकाऱ्यांनी शूट केला आहे. हा व्हिडिओ सचिनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यावेळी सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पुण्याला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकलो. हे सुंदर गाणे ऐकावे असे वाटले. मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा…पुण्याला करतोय ये जा…”
गाणं एकात असताना सचिन फार आनंदात होता. सचिनसोबत किरण मोरे यांनी देखील गाण्याच्या काही डान्स स्टेप्स केल्या. ‘मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा..’ हे जुनं कोळी गीत आहे. सचिन मराठी गाण्यांचा खूप मोठा चाहता आहे. यापूर्वी देखील त्याने मराठी गाण्यांवर ठेका धरला होता. सचिन त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमीच काहींना काही व्हिडिओ शेअर करत असतो.
काही दिवसांपूर्वी सचिनने बेस्ट बससोबतचा एक फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या फोटोसोबत सचिनने ‘rewind तो childhood’ हे कॅप्शन दिले होते. लहानपणी सचिन या बसने प्रवास करायचा. लहापणीच्या आठवणींना उजाळा देत सचिनने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
बिग बॉसच्या चाहत्यांना धक्का! ‘या’ प्रसिद्ध कपलचा झाला ब्रेकअप, पोस्ट शेअर करत दिली माहिती
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर मुस्लिमांनी अदा केली नमाज, जगभरात खळबळ
१२१ वर्षांपुर्वी ज्या KGF मध्ये ९०० टन सोनं मिळालं होतं तिची रक्तरंजित कहाणी वाचून थरकाप उडेल






