मोठी बातमी! क्रिकेटपटू के एल राहूलची प्रकृती बिघडली; उपचारासाठी तातडीने दवाखान्यात हलवले

मुंबई | आयपीएलच्या १४ व्या मोसमाला मोठ्या धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. खेळाडू मैदान गाजवताना दिसत आहेत . दिवसेंदिवस आयपीएल रंगात येत आहे. ट्रॅाफीवर आपल्या संघाच नाव कोरण्यासाठी संघाचे कर्णधार, खेळाडू धडाकेबाज कामगिरी करत आहेत.

अशातच अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मालकीचा संघ पंजाब किंग्सला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण संघाचा कर्णधार के. एल. राहूल याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पंजाब किंग्सने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये म्हटलं की, काल रात्री राहूलच्या पोटात दु:खू लागलं होतं. प्राथमिक उपचार करूनही त्रास थांबत नव्हत्या. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता अॅपेंडिक्स असल्याचं समजलं. रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

के एल राहूल भारतीय संघाचा खेळाडू आहे. त्याचे पुर्ण नाव कन्नौर लोकेश राहूल आहे. २०१४ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सूरूवात केली होती. आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

के एल राहूल कर्नाटकमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत होता. त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरूध्द खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमध्ये के एल राहूल रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर, सनरायर्झ हैद्राबाद, किंग्स इलेव्हन पंजाब या संघाकडून खेळला आहे.

पंजाब किंग्स आयपीएलच्या १४ व्या हंगामात ७ सामने खेळला आहे. त्यामध्ये ३ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. के एल राहूलने १४ व्या मोसमात ६६.२० सरासरीने ३३१ धावा फटकावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
निकाल मोठ्या मनाने स्विकारायला हवा पण भाजप रडीचा डाव खेळतय; ममतांच्या पराभवावर पवार संतापले
पंड्या बंधूंचे कौतूकास्पद काम; देशातील ग्रामीण भागासाठी दिले तब्बल २०० ऑक्सिजन संच
पोलार्डच्या वादळात चेन्नई भूईसपाट; मुंबईच्या वाघाने चेन्नईच्या तोंडातील विजय खेचून आणला

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.