केदार जाधव हा सध्या भारतीय क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय संघात खेळताना दिसत नसला तरी तो रणजीमध्ये धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक जबरदस्त इनिंग खेळली होती. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय संघात स्थान दिले पाहिजे, असे म्हटले जात होते.
असे असतानाच आता एका कारणामुळे केदार जाधव हा वादात अडकला आहे. कौटुंबिक कारण असल्याचे सांगत तो सामना अर्धवट सोडून गेला होता. पण आता तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांसोबत दिसून आला आहे. त्यामुळे तो वादात सापडला आहे.
केदार जाधव हा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून खेळत आहे. पण तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात तो मैदान सोडून बाहेर जाताना दिसला. केदार जाधव तो सामना अर्धवट सोडून घरी परतला होता. पण तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत दिसला आहे.
महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात पुण्याच्या गंहुजे स्टेडिअमवर रणजी ट्रॉफीचा सामना सुरु होता. त्यावेळी तामिळनाडूचा संघ फलंदाजी करत होता. असे असतानाच प्रशिक्षक संतोष जेधे यांनी फिल्डिंग करत असलेल्या केदार जाधवला पॅव्हेलियनमध्ये बोलावून घेतले.
त्यानंतर त्यांनी मॅच रेफरीसोबत वॉकीटॉकीने संपर्क साधला आणि केदार जाधव कौटुंबिक कारणामुळे घरी जात असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावला सुद्धा तेव्हाच याबाबत माहिती मिळाली. पण कौटुंबिक कारण सांगत केदार जाधव रोहित पवारांच्या भेटीला गेल्याचे समोर आले.
रोहित पवार यांनी पीवायसी हिंदू जिमखाना येथे केदार जाधव, चंदू बोर्डे आणि शुभांगी कदम यांची भेट घेतली. पीवायसी हे गहुंजेपासून २५ किलोमीटर लांब अंतरावर आहे. सामना सोडून केदार जाधव रोहित पवारांना भेटायला गेल्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
रितेशने मनसे नेत्याच्या मुलालाही लावलं आपल्या गाण्याचं ‘वेड’; खास व्हिडिओ आला समोर
“रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण…”
“शरद पवारांना विरोधी पक्षनेतेपद दुसऱ्या नेत्याला द्यायचं होतं, पण ऐनवेळी अजित पवारांनी…”