क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा(Andrew Syamonds) मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविले येथे कार अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.(cricketer andrew symonds dead in car accident)
क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावरून ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कार अपघातात अँड्र्यू सायमंड्स गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर अँड्र्यू सायमंड्सला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला वाचवण्याचे भरपूर प्रयत्न करण्यात आले, मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
या कार अपघातात अँड्र्यू सायमंड्सचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सच्या निधनानंतर त्याच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध माजी खेळाडू शेन वॉर्नचे ही निधन झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वीन्सलँड शहराच्या पश्चिमेला सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये रात्री १०.३० वाजता एक कारचा अपघात झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध माजी खेळाडू अँड्र्यू सायमंड्स कारमध्ये असल्याचे पोलिसांना समजले.
एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध माजी खेळाडू अँड्र्यू सायमंड्सला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अँड्र्यू सायमंड्सला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण या अपघातात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात भरधाव वेगात असलेली कार रस्त्यावर उलटल्याचे समोर आले आहे.
४६ वर्षीय अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टने श्रद्धांजली वाहिली आहे. अॅडम गिलख्रिस्टने यासंदर्भात एक केलं आहे. “हे खूप वेदनादायक आहे”, असं ट्विट ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टने केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सने २६ कसोटी, १९८ वनडे आणि १२ टी-२० सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या २००३ आणि २००७ च्या विश्वचषक विजयात त्याचा मोलाचा वाटा आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बाॅलीवूडबाबतच्या वक्तव्यावर कंगनाचा सपशेल यु टर्न; आता महेशबाबूला पाठींबा देत म्हणाली…
पठ्याने मातीपासून बनवला चक्क कुलर, ना वीजबिल ना पर्यावरणाची हानी, वाचा कसा केला हा आविष्कार
ना बुडणार, ना कोसळणार! आता घराला उचलून कोठेही घेऊन जा; तरुणीने बनवली भन्नाट घरे






