मुलाचं शतक हुकल्याचा संताप अनावर, वॉशिंग्टन सुंदरचे वडील इशांत व सिराजवर भडकले

मंबई | इंग्लंड विरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर नाबाद परतला. सुंदरला त्याच्या पहिल्या कसोटी शतकापासून वंचित राहावे लागेले आहे. याबाबत वॉशिंगटन सुंदरचे वडील एम. सुंदर यांना संताप अनावर झाला आहे.

यासंदर्भात बोलताना एम सुंदर म्हणाले, “मी टीम इंडियाच्या शेपटीच्या फलंदाजांनी केलेल्या कामगिरीबाबत फार नाराज आहे. हे फलंदाज अवघे मिनिटभरही मैदानात टिकू शकले नाहीत. समजा टीम इंडियाला विजयासाठी १० धावांची आवश्यकता असेल, तेव्हा हे फलंदाज असेच बाद झाले, तर ही मोठी चूक नसेल का?”, असा संतप्त सवाल एम सुंदर यांनी केला आहे.

त्याच झालं असं की, वॉशिंग्टन ९६ धावांवर खेळत असताना समोर तीन फलंदाज होते. परंतु या तिघांनी एकामागे एक आल्याबरोबर बाद होऊन माघारी परतीचा रस्ता धरला. तिकडे नॉन स्ट्राईकर एंडला उभा असलेला सुंदर हे फक्त पाहातच राहिला. नशीबानं त्याच्यासोबत केलेली थट्टा पाहून तो नॉन स्ट्राईकर एंडलाच खाली बसला. प्रेक्षकांकडून त्याच्या खेळीचे कौतुक झाले.

दरम्यान, वॉशिंग्टन सुंदर याचे वडील एम सुंदर यांनी इशांत आणि सिराज यांना चांगलच सुनावलं आहे. ते म्हणाले इशांत आणि सिराज या दोघांनी मैदानात उभं राहण्याचं साहस दाखवलं नाही. या दोघांनी सहज विकेट गमावली. मैदानात तग धरणं फार मोठी गोष्ट नाही. त्यासाठी तुमच्याकडे धैर्य हवं.

इंग्लंडचे गोलंदाज थकलेले दिसत होते. बेन स्टोक्स १२३ ते १२६ च्या वेगाने गोलंदाजी करत होता. तो फार आक्रमकपणे गोलंदाजी करत नव्हता. असही वॉशिंग्टन सुंदर याच्या वडीलांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
जणू काही सेहवागच फलंदाजी करत होता असं वाटलं; माजी क्रिकेटपटूने केले पंतचे कौतुक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उतरला मैदानात, त्याचा ‘हा’ व्हिडीओ क्रिकेटप्रेमींमध्ये तुफान व्हायरल
खोटं खेळून सेहवागचे शतक हुकवणाऱ्या खेळाडूवर आता आलीय ड्रायव्हरची नोकरी करून पोट भरण्याची वेळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.