क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत..

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली कॅप्टनसी सोडण्याची शक्यता आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला आजपर्यंत एकाही आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद मिळालेले नाही.

तसेच आयपीएल स्पर्धाही विराटला आजवर जिंकता आली नाही. यामुळे त्याच्यावर दबाव देखील वाढत आहे. विराट वन-डे आणि टी20 टीमची कॅप्टनसी सोडेल. त्याच्या जागी रोहित शर्माकडे कर्णधारपद जाईल. विराट बॅटींगवर अधिक फोकस करण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतो.

विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.यूएई आणि ओमानमध्ये पुढील महिन्यात टी वर्ल्ड कप होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा ऑस्ट्रेलियात एक टी 20 वर्ल्ड कप होईल.

यामुळे टीम इंडियाची टीमची बांधणी सुरू आहे. तसेच २०२३ मध्ये भारतामध्ये वन-डे वर्ल्ड कप होणार आहे. यामुळे रोहित शर्माला कर्णधारपद मिळावे अशी अनेकांची इच्छा आहे. आता विराट कोहली स्वत: हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

विराटला पुन्हा एकदा त्याच्या बॅटींगवर अधिक फोकस करण्याची इच्छा आहे. रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यामुळे त्याला कर्णधारपद दिले जावे अशी इच्छा अनेकांची आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.