Asad Rauf : आयसीसीचे माजी अंपायर आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू असद रऊफ यांच्या निधनाची बातमी नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.
असद रऊफ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पंजाबमधील लाहोर येथे असद रऊफ यांची प्राणज्योत मालवली. ते ६६ वर्षांचे होते. असद रऊफ यांचा भाऊ ताहिर यांनी ही माहिती दिली आहे. लाहोरमधील दुकान बंद करून घरी परतत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
त्यांच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये असद रऊफ यांनी २३१ सामन्यांमध्ये अम्पायरिंगचे काम केले आहे. आयसीसीने २००४ मध्ये त्यांचा आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये समावेश केला होता. रऊफ यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांबरोबरच आयपीएलमध्येसुद्धा अम्पायरिंग केली.
असद रऊफ यांच्यावर २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्या क्रिकेटमधील अम्पायरिंवर बंदी घातली. त्यानंतर त्यांचा लाहोर येथील लांडा बाजारात चपला व कपडे विकतानाचा व्हिडीओ समोर आला होता.
मुंबईतील एका मॉडेलने २०१२ मध्ये असद रऊफ यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता. या प्रकरणामुळे असद रऊफ प्रचंड चर्चेत आले होते.
२०१३ मध्ये असद रऊफ यांचे आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आले होते. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचाही आरोप होता. या सर्व कारणांमुळे त्यांचे अंपायरिंगचे करिअर संपुष्टात आले. असद रऊफ यांच्या मृत्यूमुळे क्रिकेट चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Foxconn: …तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती; वेदांताबाबत देसाईंचा मोठा खुलासा
shinde group : ४० गद्दारांनी शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा प्रयत्न केला तर कुदळ फावड्यांनी…; शिवसेनेची शिंदेगटाला जाहीर धमकी
Mumbai: मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने २२७ दवाखाने सुरु करणार, रुग्णांना मिळणार मोफत उपचार
Congress: अखेर काँग्रेस फुटलीच! माजी मुख्यमंत्र्यांसह तब्बल आठ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश