तुम्हालाही झोपेत असताना गळा दाबल्याचा भास होतो का? मग ही बातमी वाचा

झोपेत अनेकांना वेगवेगळे भास होतात. काहींना झोपेत छातीवर बसलं असून गळा दाबत आहे किंवा छातीवर प्रचंड दाब येतो. यामुळे झोपेतच ती व्यक्ती हालचाल करायला लागते. मात्र त्या व्यक्तीला हालचालही करता येत नाही.

हा सगळा भुताटकी आहे असं सांगितलं जातं. पण ही एक अंधश्रद्धा आहे. तुम्ही जर याकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास ही भुताटकी नाही हे तुम्हाला समजेल. असा अनुभव एका व्यक्तीला आला होता आणि त्याने हा अनुभव सांगितला आहे.

यामागची खरी कारणे काय होती हे त्याने सांगितलं आहे. यांत्रिकी अभियंता असलेल्या सचिन भिसे याने त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. त्याला अशा प्रकारचा अनुभव याधीही आला होता. त्याला हा अनुभव दिवसा किंवा दुपारी झोपेत असताना यायचा.

त्याला झोपेत असे वाटायचे की कोणीतरी त्याच्या छातीवर बसून त्याचा गळा दाबत आहे. यामुळे तो खुप घाबरायचा आणि ओरडण्याचा प्रयत्न करायचा. मात्र त्याच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. तो ऊठण्याचा प्रयत्न करायचा पण त्याला उठताही येत नव्हते.

अशा वेळी त्याची झोपमोड व्हायची आणि त्याला झोप येत नसे. झोपेतून दचकून उठल्यानंतर त्याला खुप घाम आलेला असे. त्याने सांगितले की हा प्रकार भुताटकीचा नसून स्लीप पॅरालिसीस नावाची अवस्था असते. याचा सामना बऱ्याचा लोकांनी केला असेल.

सचिन भिसे पुढे म्हणाले की शरीर झोपलेले असताना मेंदू जागृतअवस्थेत असतो. ज्यामुळे स्लीप पॅरालिसीस अवस्था निर्माण होते. शरीर निद्रावस्थेत असताना हातपायांवर आपला ताबा नसतो. त्यामुळे तुम्हाला हालचाल करता येत नाही.

शरीर मेंदूकडून आलेल्या आज्ञा स्विकारत नसते ज्यामुळे तुमचे शरीर एका अर्थाने शक्तीहीन असते. अनेकदा शरीर आणि मेंदू हे दोन्ही एकत्र जागृतअवस्थेत येण्यापुर्वी पहिले मेंदू जागृत होतो त्यावेळी स्लीप पॅरालिसिस अवस्था निर्माण होते.

बहुतांश लोक म्हणतात की त्यांच्या छातीवर भीतीदायक चेहरा असलेले एखादे भुत बसले होते. या भुताने त्यांना जखडून ठेवले होते. त्यामुळे त्यांना उठता येत नव्हते. प्रत्यक्षात त्या व्यक्तीचे छातीवर ठेवलेले हातच त्या व्यक्तीला जड वाटत असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.