Share

गौशाळेत उपासमारीने गायींचा मृत्यु, कावळे तोडत आहेत त्यांचे लचके, दान मागून अन्नाची व्यवस्था

उत्तर प्रदेशातील इटावा येथील परौली रामन गावातील गोशाळेत एकाच दिवसात ६ गायींचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. गायींचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर येथे दररोज एक-दोन गायींचा मृत्यू होतो. परिस्थिती इतकी वाईट आहे की कावळे आणि इतर प्राणी गायींच्या अंगाचे लचके तोडत आहेत.(Cow, Uttar Pradesh, Etawah, Upasmari, Goshala, Shuvendrasinh Chauhan, Dr. Ashok Kumar)

इटावा जिल्ह्यात एकूण १०६ लहान-मोठ्या गोशाळा आहेत. यामध्ये सुमारे १२ हजार ४००  गायी आहेत. या भागात सर्वाधिक चर्चेत असलेली परौली रामण गावातील गोशाळा अत्यंत वाईट अवस्थेत आहे. येथे ५८५ गायी ठेवण्याची क्षमता आहे. सध्या येथे ५३७ गायी आहेत. मात्र या गोठ्यात दररोज अनेक गायी उपासमारीने मरत आहेत.

मंगळवारी २४ मे रोजीच ६ गायींचा उपासमारीने मृत्यू झाला. गायींच्या मृत्यूनंतर त्यांची दुर्गति अशा प्रकारे होते की पशु-पक्षी त्यांचे अवयवांचे लचके तोडतात. गोशाळेत गायींना पुरेसे अन्न मिळत नसल्याचे बोलले जात आहे. इटावा येथील मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कुमार यांना गोशाळेतील गायींच्या मृत्यूबाबत विचारले असता त्यांनी उत्तर दिले.

अशी जनावरे गोठ्यात येतात, जी आधीच अशक्त असतात. त्यांना आधीच काही आजार असतो. वरून जनावरांना पुरेसे अन्न मिळत नाही, त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. त्याचबरोबर गायींसाठी ३० रुपये प्रति गाई या दराने पेंढ्याची व्यवस्था केली जाते, परंतु ते पुरेसे नाही. परौली रमण गावचे ग्रामप्रमुख शुवेंद्र सिंह चौहान सांगतात,

“ ३० रुपये प्रति गाई या दराने पेंढ्याची व्यवस्था आहे पण त्यासाठी पैसाही कमी पडत आहे. त्यामुळे गोशाळेत गायींच्या भोजनाची पुरेशी व्यवस्था केली जात नाही. ग्रामविकास निधीचा पैसाही गोशाळेच्या कामकाजात खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार या निधीतून दरमहा ६६ हजार रुपये जात आहेत.

गौशाळेसाठी अनुदानाची रक्कम स्वतंत्रपणे वाढवण्याची मागणी करताना गावप्रमुख शुवेंद्रसिंह चौहान म्हणाले, “तीस रुपयांत व्यवस्था करणे शक्य नाही. मी सरकारला विनंती करतो की प्रति गाय प्रतिदिन किमान ५०-६० रुपये असावी. पावसाळ्यात गायींचा जास्त मृत्यू होतो.  यावर ग्रामस्थांनी सांगितले की, गोठ्यात टिनाचे शेड करण्यात आले आहे.

पावसाळ्यात दलदल निर्माण होऊ नये म्हणून ज्याठिकाणी खड्डे आहेत ते भरण्यात आले आहेत. मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अशोक कुमार यांनी सांगितले की, दान मागून भुसा घेतात. आतापर्यंत सुमारे दोन हजार क्विंटल भुसा दानमधी भेटला आहे. यावेळीही गोशाळा अनुदानातून चालवाव्या लागतात. लोक जनावरांसाठी जे देणगी देतात त्यातून अतिरिक्त अन्न गोशाळेत आणण्याचा प्रयत्न केला जातो.

महत्वाच्या बातम्या
पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?
घरे मिळत नव्हती तेव्हा घरे द्या, मग कमी किंमतीत द्या, किंमत कमी केली तर अर्ध्या किंमतीत द्या, आता अजून…..
तब्बल ५ वर्षांनी भारतात परफॉर्म करणार जस्टिन बीबर, जाणून घ्या ठिकाण आणि तिकीटाची किंमत
भारत सोडून चालला होता, एक फोन आला, बँग भरली अन्.., वाचा RCB च्या रजत पाटीदारची कहाणी

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now