उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भटक्या जनावरांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर आता गुन्हा दाखल केला जाणार आहे. योगी सरकारने (Yogi Government) यासंदर्भात आदेश दिले आहेत. दुभत्या गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना बेवारस सोडल्यास क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती योगी सरकारने दिली आहे. (Cows are left yogi government big decision)
सोमवारी उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये गायींच्या प्रश्नावरून बराच वेळ वाद सुरु होता. सुरवातीला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी गाईच्या दुधाच्या किमंतीवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारला आहे. “म्हशीच्या दुधात फॅट असते. पण गाईचे दूध शरीरासाठी जास्त फायदेशीर असते. त्यामुळे सध्याच्या किंमतीमध्ये ४ रुपये वाढवून गाईचवी दूध विकत घेतले जाऊ शकत नाही का?”, असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी विधानसभेत उपस्थित केला.
याशिवाय समाजवादी पक्षाचे आमदार अवधेश प्रसाद यांनी विधानसभेत बेवारस गाईंच्या मृत्यूसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अवधेश प्रसाद विधानसभेत म्हणाले की, “जेव्हा गायी दूध देणे बंद करतात, तेव्हा लोक त्यांना रस्त्यावर सोडतात.” समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी देखील हा मुद्दा यापूर्वी विधानसभेत उपस्थित केला होता.
यानंतर योगी सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. दूध न देणाऱ्या गायींना रस्त्यावर सोडल्यास संबंधित गाय मालकावर गुन्हा दाखल केला जाईल, असे योगी सरकारने सांगितले आहे. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये ही कारवाई केली जाईल, असे योगी सरकारकडून सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री धरमपाल सिंह यांनी या निर्णयाच्या संदर्भात माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री धरमपाल सिंह म्हणाले की, “कसाई आणि शेतकरी यांच्यामध्ये फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेणार पण कसायांची नाही. आपली जनावरे बेवारस सोडणाऱ्या लोकांवर सरकारकडून क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे”, असे पशुसंवर्धन मंत्री धरमपाल सिंह यांनी सांगितले आहे.
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीच गाईंच्या संगोपनाबाबत निर्णय घेतले आहेत. रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या जनावरांसाठी योगी सरकारकडून चार्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राज्यात ६,१८७ गो निवारा केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आली आहेत. या गो निवारा केंद्रांमध्ये ८,३८,०१५ जनावरांना राहण्याची आणि चार्याची व्यवस्था करण्यात आली आहे”, असे देखील पशुसंवर्धन मंत्री धरमपाल सिंह यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बॉलिवूडला टक्कर! ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने रचला इतिहास, तीन दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
IPS होऊनही असमाधानी, ओंकार पुन्हा परीक्षेला बसला अन् …; मुलाचं यश भावून आईही भावुक झाली
भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाल्या “तुमच्यात तेवढी…”