ब्रेकींग! कोविशिल्ड लस अंतिम टप्प्यात; पुण्यात ‘या’ चार हॉस्पिटलमध्ये मिळणार डोस

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. याचबरोबर वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या मृत्यू संख्येत देखील मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे.

याचबरोबर अजूनही कोरोना विषाणूवर ठोस लस मिळालेली नाही. मात्र चिंतेची गरज नाही, याचे कारण असे की, लवकरच कोरोना विषाणूवरील लस आता अंतिम टप्प्यात आहे. यामुळे आता काही कालावधीत लस बाजारात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निर्मिती केलेली “कोविशिल्ड” लसीचे काम तिसऱ्या टप्प्यात आहे. याचबरोबर ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्रॉझेनेका कंपनीकडून या चाचणीच्या जगभरात चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

याचबरोबर ससून रुग्णालयात ‘कोविशिल्ड’ या कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला उद्यापासून सुरूवात होणार आहे. ससूनकडून स्वयंसेवकांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. येत्या उद्यापासून पुण्यात ससूनसह ४ हॉस्पिटलमध्ये डोस दिले जाणार आहेत.

दरम्यान, यापूर्वीच भारती व केईएम रुग्णालयामध्ये या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. तसेच दोन महिन्यांत कंपनी लसीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे. लसीच्या निर्मितीसाठी सीरम आणि ऑक्सपर्ड विद्यापीठात यापूर्वीच करार झाला आहे.

तसेच ‘या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. या लसच्या १०० कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि गवी यांच्याशी करार केला आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून मिळाली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
मिनाकुमारी बाबतच्या वक्तव्यावर तोंडावर आपटली कंगना; खोटेपणा दाखवून देत भडकले कुटुंबीय
चालु संसार मोडल्यानंतर आता दुसऱ्या लग्नाची स्वप्न बघत आहेत बाॅलीवूडचे ‘हे’ स्टार कलाकार१२ दिवसाच्या आत ‘हे’ उपाय करा, नाहीतर तुमचे नाव रेशनकार्डमधून कट होईल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.