कोवीशील्ड लसीमधील अंतर सरकारने आणखीन वाढवले; जाणून घ्या यामागचं खरं कारण

कोरोनाची साथ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तिच्यावर रामबाण उपाय म्हणून लस सर्वाना घ्यावी लागणार आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन लसींचा पुरवठा केला जात आहे.

कोविशील्ड ही लस कोरोनाच्या विरुद्ध लढण्यास प्रभावी असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. कोविशील्ड लसीमधील अंतर पण १२ ते १६ आठवड्यापर्यंत वाढविण्यात आले आहे. हा निर्णय एका अभ्यासाच्या मदतीने घेण्यात आला आहे.

सध्याच्या घडीला ही लस ७९ टक्के प्रभावी असून १२ ते १६ आठवड्यांनंतर जर ही लस घेतली तर ती ८५ टक्के प्रभावी होईल असे या अभ्यासातून सांगण्यात आले आहे. मात्र काही लोकांनी असा अंदाज वर्तवला आहे की लसींचा तुटवडा झाल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोविड वर्किंग ग्रीपचे सदस्य डॉ. एन.के अरोरा यांनी म्हटले आहे की या गोष्टीमुळे लसीचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार नाही परंतु हा निर्णय अधिक फायद्याचा ठरणार आहे. त्यावर आधी लस देण्यात आलेल्यांचे काय यावर पण त्यांनी उत्तर दिले आहे.

अरोरा यांनी पुढे सांगितले आहे की, ज्यांनी एक किंवा दोन महिन्याच्या अंतराने लस घेतली आहे त्यांना पण या निर्णयाचा काही तोटा होणार नाही. त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज पण चांगल्या तयार होतील.

कोविड वर्किंग गृपनेच लसीच्या डोसमधील अंतर वाढवून मिळावे अशी विनंती केली आणि सरकारने ती मान्य पण केली आहे. लसीच्या डोसमधील अंतर अजून एक महिना वाढवले तर काय फरक पडणार आहे? यामुळे पडलाच तर ४ ते ६ कोटी डोसमध्ये फरक पडेल.

ताज्या बातम्या
ह्रदयद्रावक… ऑक्सिजन बेडवर ‘Love U जिंदगी’ गाणं ऐकत थिरकणाऱ्या ब्रेव्ह गर्लचा मृत्यू

आधी सगळी संपत्ती नावावर करा तरच मी किडणी देईल; कोरोनाग्रस्ताच्या पत्नीचा दवाखान्यातच रूद्रावतार

मल्टीटास्कींग, इंग्रजीवर प्रभुत्व, अभ्यासू आणि संयमी वृत्ती, वाचा शरद पवारांच्या लेकीबद्दल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.