कोरोनावरील लस घेतली तरी सुटका नाहीच, ‘हे’ साईड इफेक्ट्स दिसणार; संशोधनातून सिद्ध

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. अशातच सर्वांचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. दिलासादायक बाब म्हणजे फायजर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका, स्पुटनिक व्ही या लसी शेवटच्या टप्प्यात आहेत. यामुळे आता लवकरच कोरोना लस बाजारात येईल अशी माहिती मिळत आहे.

अशातच याचबरोबर आतापर्यंत बहुतांश लसींचे शरीरावर परिणाम दिसून आलेले नाहीत. परंतु लसीवर वेगाने संशोधन झाल्यानं काही प्रमाणात साईड इफेक्ट्स दिसू शकतात, अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता चिंतेत आणखी भर पडली आहे.

तसेच याबाबत मोदी सरकारने सर्व राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या संभाव्य साईड इफेक्ट्सचा सामना करण्याची तयारी करण्याची सूचना केंद्राकडून करण्यात आली आहे.

वाचा संशोधनातून काय आहे पुढे…
फायजर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका लसींचे दिलेले बरेचसे साईड इफेक्ट्स सारखेच आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार मॉडर्नाची कोरोना लस टोचण्यात आलेल्या अनेकांना ताप आला. त्यांना थरथरण्याचाही त्रास झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

तसेच इतर लसींची चाचणी करण्यात आलेल्यांना डोकेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. तसेच पचन यंत्रणेवर थोडा परिणाम होऊ शकतो. मॉडर्नाची कोरोना लस देण्यात आलेल्या एका व्यक्तीला उलटी, मरगळ अशा प्रकारचा त्रासही झाला असल्याचे समोर आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
तुम्ही व्हिलन झालात म्हणून मी हिरो झाले न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाचा पुन्हा तडाखा
…हे मी बोललेच नाही, एबीपी माझाने तात्काळ माफी मागावी – पंकजा मुंडे
कंगना राणावतने केलेल्या टिकेवर पहिल्यांदाच बोलले मुख्यमंत्री, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.