डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार लस; अखेर ‘या’ कंपनीला मिळाले लस तयार करण्यात यश

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. अलीकडे कोरोना रूग्नांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कोरोना रूग्नांचे मृत्यू प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच अजूनही कोरोनावरील लस तयार झालेली नाहीये.

अशातच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. लस डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी व्यक्त केला आहे. अदार पूनावाला म्हणाले आहेत की, ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका परीक्षेच्या निकालाच्या आधारावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोना लशीसाठी आणीबाणी परवान्यासाठी अर्ज करू शकणार आहे.

याचबरोबर या लशीच्या सुरक्षेबाबत सध्या कोणताही प्रश्न नाही. परंतु या लसीचे पुढे काय परिणाम होतात ते समजण्यासाठी किमान २ ते ३ वर्षांचा वेळ जावा लागेल असे त्यांनी सांगितले आहे.

तसेच ऑक्सफोर्ड आणि सीरम इन्सिस्टीट्यूटनं तयार केलेल्या या लशीची चाचणी ब्रिटनमध्ये सुरू आहे. त्यांनी हा डेटा सर्वांना दिला तर आपत्कालीन चाचणीसाठी आरोग्य मंत्रालयाकडे अर्ज करणे सोपं होईल. तसेच यानंतर आरोग्य मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर ही लस डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोरोना लसीबाबत पूनावाल यांनी सांगितले की, ही लस डिसेंबरपर्यंत तयार होईल मात्र लस वापरण्यासाठी परवाना मिळणं आवश्यक आहे. तसेच परवानगी मिळाली नाही तर कोरोनाची लस जानेवारीपर्यंत भारतीयांसाठी उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
कार घ्यायचीय? बाईकच्या किंमतीत खरेदी करा ह्युंदाईची ही शानदार कार
खुशखबर! डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार कोरोनाची लस; आदर पुनावालांची माहिती
लॉकडाऊनमुळे ‘या’ आजाराचा वाढतोय धोका, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.