कोरोना संक्रमणामुळे वाढतोय आजारांचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण

मुंबई | देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. दररोज लाखो नागरिक या भयानक कोरोना विषाणूचा सामना करत आहे. अशातच करोना संक्रमणामुळे अनेक आजारांचा धोका असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

याबाबत अनार सिंह वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर राखी मेहरा यांनी कोरोनाच्या संक्रमणानंतर कोणत्या आजारांचा धोका उद्भवू शकतो, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

वाचा कोरोना विषाणूपासून कोणत्या आजारांचा होऊ शकतो धोका…

सांधेदुखी –

कोरोना संक्रमणानंतर अनेक नागरिकांना सांधेदुखी सुरू होते. याचे कारण असे की, शरीरात अशक्तपणा असतो. ज्यांना आधीच संधिवात किंवा सांधेदुखीची समस्या आहे अशक्तपणामुळे जास्त त्रास सहन करावा लागतो.

हृदयरोग –

ज्याला अधिक हृदयविकार आहे अशा नागरिकांना कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर राखी मेहरा यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो आणि रक्तदाब कमी होण्याची शक्यता देखील असू शकते.

न्यूमोनिया –

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमणानंतर जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत होते आणि कोरोना विषाणूमुळे फुफ्फुसांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते, तेव्हा फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा धोका वाढतो.

महत्त्वाच्या बातम्या
गुड न्यूज! ‘या’ कंपनीने केंद्राकडे मागितली कोरोना लसीकरणाची परवानगी
हजारो कोटींची संपत्ती मागे सोडून गेले MDH मसाल्याचे मालक गुलाटी; एकून संपत्ती पाहून डोळे पांढरे होतील
डॉ. शीतल आमटे आत्मह.त्या प्रकरणात धक्कादायक माहिती; कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्मह.त्या?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.