मुंबई | राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारकडून शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. कोरोनाच्या जीवघेण्या फैलावामुळे महाराष्ट्रात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.
तसेच राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचबरोबर काही दिवसांपूर्वी मॉल, दुकाने सुरु करण्यात आली आहे. तसेच दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरंही सशर्त सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व सवलती आणि सुविधा ठरलेल्या नियमांप्रमाणे कायम असणार असल्यामुळे नागरिकांसाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, बुधवारी देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या.
राज्यात पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भावात वाढ होत असून आजही कोरोना रुगणांची संख्या 6 हजारांपेक्षा जास्त आढळून आली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी ४ हजार ८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ७२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘मुख्यमंत्र्यांची सामनातील मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीची नाही’
“महाराष्ट्र सरकारविरुद्ध भुंकणाऱ्यांना व चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले”
एक रिक्षाचालक ते रियल इस्टेट किंग, जाणून घ्या कसे बनले अविनाश भोसले करोडोंच्या कंपनीचे मालक