‘पूरग्रस्त भागात ३ दिवसात ११३७ किलोमीटर फिरलो, आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार’

मुंबई । राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. तर अनेक ठिकाणी दरड कोसळून संपूर्ण गावे ढिगाऱ्याखाली गेली आहेत. अनेक रोड उध्वस्त झाले आहेत. यामुळे सर्व राजकीय नेते सध्या या ठिकाणी दौरे करत आहेत.

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या भागात दौरा केला. त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी देखील हा दौरा केला. यावेळी त्यांनी मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागाचा दौरा करत तीन दिवसात ११३७ किलोमीटरचा प्रवास केला. आता त्यांना मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारकडून देखील ७०० कोटींची मदत करण्यात आली आहे. राज्य सरकारने लगेच प्रत्येकाला १० हजार तत्काळ मदत करणार असल्याचे सांगितले आहे. पुन्हा पंचनामे करून अजून जास्त मदत केली जाणार आहे.

या दौऱ्यावेळी अनेक नेत्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना अनेकांनी प्रश्न विचारले. तुम्ही काय करता असा संतप्त सवाल अनेकांनी उपस्थित केला.

आता राज्य सरकारकडून मोठी संरक्षण भिंत उभारली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी मोठा खर्च होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे हे पाणी आडवले जाणार आहे. याबाबत चाचपणी सुरू आहे.

ताज्या बातम्या

..वेळ आली तर सेनाभवन फोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

तुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव? वाचा त्यांच्याबद्दलचा हा खास लेख

सेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून डॉक्टरही शॉक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.