पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड(Khed) तालुक्यातील भामाआसखेड धरणात(Dam) पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. रोहन संजय रोकडे(वय-२४) आणि प्राजक्ता देविदास पवार (वय- २०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.(cousine and brother dead drowing in dam)
मिळालेल्या माहितीनुसार, होळीची सुट्टी असल्यामुळे चौघेजण धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघे जण पाण्यातून सुखरूप बाहेर आले. पण रोहन आणि प्राजक्ता यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. प्राजक्ता ही रोहनची मामेबहीण आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरवातीला पोलिसांना मृतदेह शोधण्यात अपयश आले. त्यानंतर मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची मदत घेण्यात आली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना त्या दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणात माहिती देताना सांगितले की, बिदरवडी येथील रोकडे कुटुंबीय आपल्या नातेवाईकांसोबत भामाआसखेड धरण परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी चार जण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. त्यावेळी चार जणांपैकी दोघे जण पाण्यातून सुखरूप बाहेर आले. पण पण रोहन आणि प्राजक्ता यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावातील स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक रहिवाशांची मदत घेत एक मृतदेहाचा शोध घेतला. दुसरा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची मदत घेतली. चाकण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. यातील एक जण यात्रेसाठी मुंबईहून गावी आला होता. त्यानंतर तो मित्रासोबत धरण परिसरात फिरायला गेला होता. त्यानंतर दोघे पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. पण त्या दोघांपैकी एका तरुणाला पोहायला येत नसल्याने तो बुडू लागला त्यावेळी दुसऱ्या तरुणाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता.
महत्वाच्या बातम्या :-
गोव्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी, ‘या’ नेत्याच्या खांद्यावर सोपवली जबाबदारी
मराठी बिग बॉस विनर विशाल निकमचे नशीब पुन्हा चमकले, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? राऊतांचा MIM ला टोला