नागपुर | पती पत्नीमध्ये काही ना काही कारणावरून भांडणे होत असतात. कधी कधी ही भांडणे विकोपाला जावून परिसरात घटना घडल्याचं आपण पाहतो. नागपुरात अशीच एक पतीपत्नीच्या भांडणाची घटना घडली आहे. याची दखल घेत नागपुर खंडपीठाने पतिच्या बाजूने निकाल देत पत्नीला दणका दिला आहे.
ऐकावं ते नवलच! गर्लफ्रेंडला भेट द्यायला चोरलं उंटाचं पिल्लू; अन्…
24 ऑक्टोंबर 2007 मध्ये या जोडप्याचा विवाह झाला होता. पतिच्या कुटूंबासोबत काही दिवस राहिल्यावर पत्नी छोट्या छोट्या कारणावरून पतीशी भांडणे करत होती. नवरा आणि ती असे दोघेच जण राहण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे ती अनेक वेळा पतीला न सांगताच माहेरी जायची. पतीने अनेकवेळा समजूत घालूनही तिच्यात काही फरक पडत नव्हता. पत्नीने तर थेट पती विरोधातच त्रास देत असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली.
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरूणीने लग्नाला नकार दिल्याने तरूणाने उचलले टोकाचे पाऊल
पतीने सांगितले की मुलाचा जन्म झाल्यावर पत्नी सासरी येत नव्हती. कायदेशीर नोटिस पाठवल्यावर ती सासरी राहण्यास आली. एकत्र कुटूंबात राहण्याची तिची इच्छा नसल्याने दुसरीकडे भाड्याने रूम घेतली. परंतू तिथेही ती माझ्यासोबत वाद घालत असे.
पहिल्याच ऑक्शनमध्ये ५ कोटी २५ लाखांना विकला गेलेला शाहरूख खान कोण आहे माहिती का?
पत्नीच्या भांडणाला वैतागून पतीने घटस्फोटासाठी कुटूंब न्यायालयात याचिका दाखल केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने याचिका मंजुर करत घटस्फोट योग्य ठरवला आहे. या निर्णयाविरोधात पत्नीने उच्च न्यालयात अपील केल्यावर पत्नी पतीला त्रास देत असल्याने उच्च न्यायालयानेही पत्नीचा अपील फेटाळून लावत कुटूंब न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला आहे.
स्वत:ची फसवणूक टाळा! ‘या’ कंपनीकडून वाहन इन्शुरन्स घेऊ नका, IRDAI चा इशारा