मोठी बातमी! मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास थांबवा; न्यायालयाचा एटीएसला आदेश

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या प्रकरणी एनआयएने एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांना अटक करून त्यांना कोठडी सुनावली आहे.

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे. तर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर कारमध्ये सापडलेल्या स्फोटकांचा तपास एनआयए करत आहे. या दोन्ही प्रकरणात सचिन वाझे यांच नाव समोर येत आहे.

एटीएस या प्रकरणातील महत्वाची कागदपत्रे एनआयएला देत नसल्याने एनआयएने एटीएस विरोधात याचिका दाखल केली होती. यानंतर ठाण्याच्या कोर्टातील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एटीएसला मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास थांवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तपासातील कागदपत्रे तात्काळ केंद्रीय तपास पथक एनआयकडे द्यावीत. असंही एटीएसला दिलेल्या आदेशात कोर्टाने म्हटले आहे.

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख शिवदीप लांडे यांनी काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणाचा उलगडा झाला असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने याआधीच एनआयएला मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला होता. महाराष्ट्र एटीएसला हिरेन यांच्या हत्येचा तपास थांवण्यास सांगण्यात आल्याने राज्य सरकार आणि एटीएसला मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात लॉकडाऊन करायचा की नाही यावरून आरोग्यमंत्री व महापौरांमध्ये जुंपली
खुशखबर! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, मोदी सरकारचे मोठे संकेत
फडणवीसांनी शरद पवारांना पुराव्यानिशी उघडे पाडले; उतारवयात इतकी बेइज्जती होऊ नये
दिल्लीत परमबीर सिंग कुणाला भेटले? वेळ येताच संपूर्ण माहिती उघड करू; नवाब मालिकांचा इशारा

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.