बाॅलीवूडला धक्का! सुशांत प्रकरणात सलमान, करणसह आठ सेलिब्रिटींना कोर्टाची नोटीस

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात न्यायालयाने आता एक महत्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने ८ मोठ्या सेलिब्रिटींना कोर्टात हजर राहायला सांगितले आहे. न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला असून ही या प्रकरणात महत्वाची घडामोड मानली जात आहे.

या सेलिब्रिटींमध्ये अनेक बड्या कलाकारांचा समावेश आहे. सलमान खान, करण जोहरसह यांच्यामध्ये ८ मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. ७ ऑक्टोबरला कोर्टात हजर राहा असा आदेश मुज्जफरपूर जिल्हा न्यायालयाने दिला आहे. मोठे अभिनेते, निर्माते दिग्दर्शक आणि इतर बड्या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. सुशांतच्या चाहत्यांना सत्य जाणून घ्यायचे आहे. अनेकांना या प्रकरणाच्या संदर्भात प्रश्न पडले आहेत. यासाठी एका वकिलाने पुढाकार घेतला असून मुज्जफरपूर न्यायालयात त्याने एक याचिका दाखल केली आहे.

या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सेलिब्रिटींना नोटिसा बजावल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशामध्ये सलमान खान, करण जोहर, आदित्य चोप्रा, साजिद नाडियावाला, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, भूषण कुमार आणि दिनेश विजयन या ८ जणांची नावं आहेत.

७ ऑक्टोबरला सर्व ८ सेलिब्रेटींनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर रहावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला असून त्यांच्या वतीने त्यांचे वकिलही बाजू मांडू शकतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.