अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. अभिनेत्री केतकी चितळेला(Ketaki Chitale) आता ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांकडून अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली होती.(court give order to ketaki chitale coustody till 7 june)
अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात इतर पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यामध्ये अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात केली होती. या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळे न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात सुरवातीला अभिनेत्री केतकी चितळेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती.
या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे,समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ?”
“तू तर मच्छर भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड”, अशा आशयाची पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर शेअर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात ठाणे पोलिसांनी कारवाई करत अभिनेत्री केतकी चितळेला अटक केली होती. यापूर्वी देखील अभिनेत्री केतकी चितळे अनेकवेळा वादात सापडली होती. अभिनेत्री केतकी चितळेने मालिकेतून काढल्यानंतर दिग्दर्शकावर गंभीर आरोप देखील केले होते.
महत्वाच्या बातम्या :-
‘मुख्यमंत्र्यांनी छत्रपती घराण्याचा मान ठेवावा’; संभाजीराजेंनी एका वाक्यात संपवला विषय
पोलिस अधिकारी हेमंत करकरेंच्या मृत्यूला उद्धव ठाकरेंच्या जवळचा ‘हा’ शिवसेना नेता जबाबदार
मोठी बातमी! महागड्या घडाळ्यांचे आमिष दाखवून ‘या’ क्रिकेटरने ऋषभ पंतला लावला १.६३ कोटींचा चुना






