नागपूरमधून(Nagpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती(Husband) शारिरीक संबंधासाठी बळजबरी करत असल्याने पत्नीने न्यायालयात घटस्फोटासाठी(Divorce) अर्ज दाखल केला होता. यावर नागपूर कौटुंबिक न्यायालयाने पत्नीच्या घटस्फोटाच्या अर्जाला संमती दिली. पत्नीची इच्छा नसताना तिच्यावर बळजबरी करत शारिरीक संबंध प्रस्थापित करणे ही क्रूरता असल्याचे स्पष्ट केले आहे.(court give order to divorce in husband wife case)
हे जोडपे नागपूरमधील वाडी परिसरात राहत आहे. पत्नीचे वय २२ वर्ष असून पतीचे वय २८ वर्षे आहे. या जोडप्याचा २०१७ मध्ये विवाह(Marriage) झाला होता. व्यसन असल्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. पत्नीने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर पती तिच्यावर बळजबरी करायचा. तिला मारहाण करायचा.
पती तिचे हात-पाय बांधून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करायचा. पत्नी ओरडू नये, याकरिता तो तिच्या तोंडात कापडाचा बोळा घालायचा. या प्रकारानंतर घाबरलेल्या पत्नीने माहेर गाठले. पत्नीने घडलेला सर्व प्रकार तिच्या सासूला सांगितला. यावर ‘असे परत होणार नाही’, अशी शाश्वती पत्नीच्या सासूने तिला दिली.
यानंतर पत्नी पुन्हा सासरी परतली. पण तिच्या पतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट दिवसेंदिवस पती तिच्यावर जास्त बळजबरी करू लागला. यामुळे कंटाळून पत्नी पुन्हा एकदा माहेरी गेली. यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. अखेर पत्नीने पतीचे घर सोडून दिले.
पत्नीने वकील श्याम अंभोरे यांची मदत घेत नागपूर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने या प्रकरणात दोन्ही पक्षांची बाजू एकूण घेतली. त्यानंतर न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली. या प्रकरणाचा निकाल देत असताना न्यायालयाने स्पष्ट केले की, पत्नीची इच्छा नसताना तिच्यावर बळजबरी करत शारिरीक संबंध प्रस्थापित करणे ही क्रूरता आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. या प्रकरणी पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
भैय्यु महाराजांच्या आत्महत्येच्या प्रकरणात भक्तांनी केली ‘ही’ मागणी, आरोपी हायकोर्टात
सुट्टीवर आलेल्या सैनिक पतीचा पत्नीनेच काढला काटा, कारण समोर आल्यावर पोलिसही चक्रावले
६० वर्षांच्या पुरूषाने १० राज्यांमधील २७ उच्चपदस्थ महिलांसोबत केले लग्न, पोलिसही झाले अवाक