सुनावणीदरम्यान बनियानवरच आला होता आरोपी; संतापलेल्या न्यायाधीशांनी दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

अनेकदा न्यायालयात लोक गैरवर्तन करताना दिसून येतात, त्यामुळे त्यांना असे करणे चांगलेच महागात पडले असते. आता अशीच घटना समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्चुअल सुनावणीदरम्यान एक आरोपी थेट बनियान घालून आला होता, त्यामुळे त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने त्या व्यक्तीला दंड ठोठावला आहे. व्हर्च्युअल सुनावणीच्या माध्यमातून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यावेळी आरोपीने बनियान घालून हजेरी लावली. त्यावर नाराजी व्यक्त करत न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याला १० हजार रुपये दंड भरण्यास सांगितले आहे.

आदेशानुसार, त्याला हे पैसे दिल्ली उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडे जमा करावे लागतील. वैवाहिक विवादाशी संबंधित एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका निकाली काढताना न्यायालयाने हा आदेश दिला. ज्या व्यक्तीवर हा दंड ठोठावण्यात आला आहे ती व्यक्ती एका महिलेने तिचा पती आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपी होता.

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी एका आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्या क्रमांक ५ च्या न्यायालयासमोर केलेले वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे. खटल्याची अक्षरश: सुनावणी सुरू असतानाही त्यांनी योग्य वेशात कोर्टात हजर व्हायला हवे होते. तो बनियान मध्ये आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी जुलैमध्ये दोन्ही पक्षांनी त्यांचा वाद मिटवला होता आणि एफआयआर रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाने याचिका स्वीकारली आणि दिल्लीच्या सफदरजंग एन्क्लेव्ह पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये दाखल केलेला एफआयआर रद्द केला. अशावेळीच तो आरोपी सुनावणीच्या वेळी बानियानवर आल्याने न्यायधीशांनी त्याला दंड ठोठावला आहे.

कोरोनामुळे सध्या बहुतांश प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे. कपड्यांबाबत सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी एखाद्याला अडवल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी गेल्या वर्षी जूनमध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान एक वकील टी-शर्ट घालून बेडवर पडलेला दिसला होता.

वकिलाच्या अशा वर्तवणूकीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाने व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान किमान न्यायालयीन शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे असा आग्रह धरला होता. नंतर, वकिलाने न्यायाधीशांची बिनशर्त माफी मागितली, जी मान्य करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या-
‘शेतकरी अतिरेकी आहेत, तर मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले? शेवटी अहंकार पराभूत झाला’
मराठमोळ्या मुलाच्या कल्पकतेला आनंद महिंद्रांची दाद; बिझनेससाठी दिली कोट्यवधींची ऑफर
गुजराती गायिकेवर लोकांनी पाडला पैशांचा पाऊस, पोती भरून टाकले पैसे; व्हिडिओ बघून होतील डोळे पांढरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.