“न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही”

मुंबई । सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा आला आहे. सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

यामुळे महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर आता विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर या संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. “न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही,” अशी प्रतिक्रिया भाजप नेते राम कदम यांनी दिली.

सीबीआयची टीम उद्या मुंबईत येऊन सुशांतच्या घराची तपासणी करणार आहे. त्यानंतर सीबीआय मुंबई पोलीसांनाही भेटणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान सुशांतसिंह राजपूत प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपुर्द केल्याने, सीबीआय आता चौकशीला लागली आहे. याप्रकरणी अजून काय माहिती समोर येणार हे लवकरच समजेल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.