सध्या सर्वत्र दिल्लीतील कुतुबमिनार प्रकरणाची चर्चा सुरु आहे. आज दिल्लीतील न्यायालयात कुतुबमिनार प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाचा निकाल ९ जून रोजी दिला जाणार आहे. आज एएसआय आणि हिंदू(Hindu) अशा दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हिंदू पक्षाला चांगलेच सुनावले आहे.(court angry on hindu side on petition of kutubminar)
२७ मंदिरे पाडून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळायला हवा, अशी मागणी हिंदू पक्षाने न्यायालयाकडे केली होती. त्यावर जर देवता त्या ठिकाणी ८०० वर्षे पूजा केल्याशिवाय राहत असतील तर त्यांना असेच राहू दिले जाऊ शकते, असे न्यायालयाने उत्तर दिले आहे.
कुतुबमिनार प्रकरणात न्यायालय ९ जून रोजी निर्णय देणार आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना एका आठवड्यात लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे. मशिदीच्या परिसरात असलेल्या हिंदू जैन देवतांच्या पूजेला परवानगी द्यायची की नाही, यासंदर्भातील निर्णय न्यायालयाकडून ९ जून रोजी देण्यात येणार असल्याचे न्यायाधीश निखिल चोप्रा यांनी सांगितले.
यापूर्वी दिवाणी न्यायालयाने कुतुबमिनार प्रकरणात हिंदू पक्षकारांची याचिका फेटाळून लावली होती. एएसआय पक्षाने न्यायालयात आपली बाजू मांडताना युक्तिवादात म्हटले आहे की, “कुतुबमिनारमध्ये धार्मिक कार्य होऊ शकत नाही कारण ते एक स्मारक आहे.” यावर हिंदू पक्षाने देखील आपली बाजू मांडली आहे.
हिंदू पक्षाच्या वतीने हरिशंकर जैन म्हणाले की, २७ मंदिरे पाडून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आले आहे. याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे या ठिकाणी आम्हाला पूजा करण्याची परवानगी द्यावी”, अशी मागणी हिंदू पक्षाच्या वतीने हरिशंकर जैन यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर तुम्हाला स्मारकाला प्रार्थनास्थळ बनवायचे आहे का? अशी विचारणा न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान केली आहे.
‘ज्या मशिदीबद्दल बोलले जात आहे, त्या मशिदीचा वापर अद्याप झालेला नाही. त्यामुळे मशिदीऐवजी मंदिर बांधण्याची मागणी का केली जात आहे? असा सवाल न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान केला आहे. यावर हरिशंकर जैन यांनी स्मारक कायद्याचा संदर्भ दिला आहे. “आम्हाला कोणतेही मंदिर बांधायचे नाही. फक्त पूजा करण्याचा अधिकार हवा आहे”, असे हरिशंकर जैन म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
मालवणातील तारकर्ली बीचवर मृत्यूचे तांडव; २० पर्यटकांनी भरलेली बोट भर समुद्रात बुडाली
जेव्हा मिमिक्रीमुळे वादात सापडली होती सुगंधा मिश्रा, कंगनाने दिली होती थेट ‘ही’ धमकी, वाचा किस्सा
पाकिस्तानी गायकाने करण जोहरवर लावला गाणं चोरल्याचा आरोप, T-series ने दिले चोख प्रत्यु्त्तर, म्हणाले..