Homeक्राईमकोर्टाने ६७ वर्षीय व्यक्तीची जप्त केली कवळी, सेक्सवेळी बायकोला रक्त येईपर्यंत चावायचा

कोर्टाने ६७ वर्षीय व्यक्तीची जप्त केली कवळी, सेक्सवेळी बायकोला रक्त येईपर्यंत चावायचा

मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहरात एक विचित्र घटना पाहायला मिळाली आहे. एका पत्नीने तिच्या पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माझा पती माझ्याशी अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध ठेवतो, असा आरोप त्या महिलेने केला होता. या प्रकरणात डिसेंबर महिन्यात त्या महिलेच्या पतीला इंदूर पोलिसांनी अटक केली होती.

या पीडित महिलेचं लग्न गुजरातमधील ६७ वर्षीय जुलरसोबत झालं होतं. ही महिला इंदूरमध्ये राहणारी आहे. पण जुलरसोबत झालेल्या लग्नानंतर ही महिला गुजरातला गेली होती. पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये २७ वर्षांचे अंतर आहे. ६७ वर्षीय जुलरने या पीडित महिलेसोबत दुसरं लग्न केलं होतं.

या पीडित महिलेनं सांगितलं की, “गुजरातमधून माझ्या पतीने मला उदयपूरला नेले. तिथे तो माझ्याशी अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध ठेवायचा. माझ्या पतीने दात नव्हते. त्याने दातांची कवळी बसवली होती. तो त्या दातांनी माझ्या शरीरावर चावा घ्यायचा “, असा आरोप त्या पीडित महिलेने केला आहे.

त्या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर पती सातत्याने अशी वागणूक देत होता. त्या महिलेने पतीला अशा कृत्यांसाठी विरोध केला. पण पती त्या पीडित महिलेला धमकी द्यायचा. याबद्दल त्या पीडित महिलेने इंदूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. माझा पती माझ्याशी अतिशय क्रूरपणे वागतो, असे त्या पीडित महिलेने तक्रारीमध्ये सांगितले होते.

या प्रकरणात पुरावा म्हणून महिलेच्या वकिलाने कोर्टात जखमेचे फोटो शेअर केले होते. यानंतर कोर्टाने महिलेसोबत घडलेल्या प्रकाराबाबत तातडीने कारवाई केली. सोबत पोलिसांना आरोपीची दातांची कवळी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशातील विविध सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

महिलेने सांगितलं की, “जूलरच्या पहिल्या पत्नीचं कोरोनामध्ये मृत्यू झाला होता. त्या आधीपासूनच ती पतीपासून वेगळं राहत होती. एका नातेवाईकांकडून हे मागणं आलं होतं. ऑक्टोबर 2021 मध्ये आम्ही दोघांनी लग्न केलं होतं.” या घटनेमुळे पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
बुली बाई ऍप: नेपाळी युवकाचे मुंबई पोलिसांना खुल्ले आव्हान, म्हणाला, हिम्मत असेल तर अटक करून दाखवा
पंजाबमधील रॅलीपेक्षा पीएम मोदींच्या पुनरागमनाचा भाजपला अधिक फायदा होईल का? जाणून घ्या
‘’कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या पाहिल्यानंतर मोदींनी आपली नौटंकी सुरू केली, ते दिल्लीला परतले’’

ताज्या बातम्या