अमेरिकेतील एका विद्यापीठात पोर्नोग्राफी आधारित एका अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आलीआहे. अमेरिकेमधील उटाह येथील वेस्टमिन्स्टर महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. वेस्टमिन्स्टर हे कला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाने(College) नवीन हंगामासाठी पोर्नोग्राफीवर एक कोर्स लागू केला आहे.(Courses on Pornography to be taught in ‘this’ College; Read full course details ..)
या कोर्समध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रेडिट मिळवण्यासाठी एकत्र बसून पॉर्न चित्रपट पहावे लागणार आहेत. Film 3000 पोर्न या नावाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालयातील जेंडर स्टडीज अभ्यासक्रमांतर्गत हा कोर्स येतो. वेस्टमिन्स्टर महाविद्यालयाने या अभ्यासक्रमासंदर्भातील माहिती आपल्या वेबसाइटवर दिली आहे.
रविवारी खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलपेक्षा विद्यार्थ्यांना पोर्नोग्राफी विषयामध्ये अधिक रुची आहे, अशी माहिती वेस्टमिन्स्टर महाविद्यालयाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या म्हणण्यानुसार, अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ‘वंश, वर्ग, लिंग यांचे लैंगिकीकरण’ या विषयावर अर्थपूर्ण चर्चा करणे हा आहे.
या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांचे विश्लेषण करण्याची संधी मिळत आहे, असे महाविद्यालयाने सांगितले आहे. या अभ्यासक्रमामुळे महाविद्यालयाला जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. या अभ्यासक्रमाच्या वर्णनाचा एक स्क्रीनशॉट सध्या ट्विटरवर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.
या स्क्रीनशॉट मध्ये लिहिले आहे की, “हार्डकोर पोर्नोग्राफी ही फ्रायडे-नाईट फुटबॉलपेक्षा जास्त लोकप्रिय आहे. आम्ही या अब्ज डॉलर्सच्या उद्योगाला एक सांस्कृतिक प्रक्रिया म्हणून पाहतो. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना या विषयावर चर्चा करता येणार आहे. या अभ्यासक्रमांतर्गत क्रेडिट सिस्टीमद्वारे अभ्यास करणारे विद्यार्थी एकाच वेळी पोर्न चित्रपट पाहतील.”
“या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वंश, वर्ग आणि लिंग या विषयांवर तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे”, अशी माहिती वेस्टमिन्स्टर महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे. अनेकांनी या अभ्यासक्रमाचा विरोध केला आहे. ‘शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वर्गात एकत्र पोर्नोग्राफी पाहणे, हे अस्वस्थ करणारे आहे’, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
राष्ट्रवादीची ‘ही’ महीला नेता पंतप्रधान मोदींच्या घरासमोर नमाज पठण करणार, सोबतच….
‘SC-ST, OBC समाजातील लोक उच्च जातीतील लोकांपेक्षा ४ ते ६ वर्षांनी कमी जगतात’; रिपोर्टमधून खुलासा
घरात कोल्ड्रींक्सची पेटी आणि धनुष्यबाण ठेवायला सांगताहेत भाजपचे नेते; कारण वाचून धक्का बसेल