नादच खुळा! लठ्ठपणाला कंटाळून जोडप्याने लावली जिम मग..; फोटो पाहून आजच व्यायामाला सुरूवात कराल

लठ्ठपणाला अनेकजण कंटाळलेले असतात. त्यांना नेहमी असे वाटते की आपण चांगले दिसत नाही किंवा आपले वजन कसे कमी होईल. पण तुम्ही जर मनात आणलं तर तुम्ही कोणत्याही समस्येवर मात करू शकता.

याचेच एक उत्तम उदाहरण सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही गोष्ट जरी जुनी असली तरी या जोडप्याकडून घेण्यासारखे खुप काही आहे. ही गोष्ट आहे २०१८ ची. या मारवाडी जोडप्याच्या ट्रांसफॉर्मेशनमुळे लोक थक्क झाले आहेत.

त्यांचे नाव आदित्य आणि गायत्री शर्मा आहे. हे दोघेही आपल्या शरीरयष्टीमुळे आजिबात खुश नव्हते. मग त्या दोघांच्याही मनात फिट होण्याचा विचार आला. या दरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यांनी कधीही हार मानली नाही.

दोघांनीही वर्कआऊट करून आहारावर नियंत्रण ठेवले आणि स्वताला फिट ठेवण्याचा प्रयत्न केला. आधी आदित्य यांचे वजन ७२ किलो होते. त्यांच्या पत्नीचे वजन ६२ किलो होते. आज ते दोघेही अनेक कपल्सचे आदर्श बनले आहेत.

तुम्ही जर इंस्टाग्रामवर त्यांचे प्रोफाईल पाहिले तर तुम्हाला त्यांचे फोटोज पाहून त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन कळेल. त्यांनी या अकाउंटवर अनेक फोटोज शेअर केले आहेत. त्यांचे दोन हजारापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

त्या दोघांनी बरेच वजन कमी केले आहे. आदित्यने २० किलो वजन कमी केले आहे. त्याने आपल्या पत्नीकडूनही खुप मेहनत करून घेतली आहे. दोघेही खुप आकर्षक आणि सुंदर दिसू लागले आहेत. हे दोघे आई वडिल आहेत.

घर सांभाळत असताना त्यांनी आपल्या शरीरासाठी वेळ काढला. गायत्रीने ३ महिन्यात ११ किलो वजन कमी केले आहे. आता त्यांची कंबर फक्त २५ इंचाची आहे. सध्या हे दोघेही प्रोफेशनल न्युट्रिशन कंसलटंट म्हणून ऑनलाईन क्लास घेत आहेत.

त्यांनी अनेकांना मदत देखील केली आहे. ते सध्या अनेक लठ्ठ व्यक्तीसांठी प्रेरणादायक ठरले आहेत. माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या
ऐश्वर्याच्या प्रेमात पागल होता ‘हा’ अभिनेता, सतराव्या मजल्यावरुन उडी मारण्याचा केला प्रयत्न
धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला आला हृदयविकाराचा झटका; मृत्यूपूर्वी त्याने वाचवले ३५ जणांचे जीव
वाचा पद्मिनी कोल्हापूर आणि राजीव कपूरची हटके लव्ह स्टोरी; ‘या’ व्यक्तिमूळे पद्मिनी कोल्हापूरे कपूर घराण्याची सुन होऊ शकल्या नाहीत
‘फॅन्ड्री’ चित्रपटातील जब्याचा नवीन लुक पाहून तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.