भठिंडा | नवीन लग्न झाल्यानंतर वाढदिवस साजरा करण्याचे कारण सांगत एका दाम्पत्याने भठिंडा येथील हॉटेलमध्ये रुम घेतली. यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या पतीचा संशयास्पद मृत’देह रुममध्ये सापडला आहे. या घटनमुळे परिसारात खळबळ उडाली आहे.
हॉटेलच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या हॉटेलच्या रुममध्ये आढळलेला मृ’तदेह हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या पती-पत्नी यातील पतीचा आहे. या दाम्पत्याने वाढदिवस करण्याचे सांगत रुम भाड्याने घेतली होती. तसेच आणखी काही गेस्ट येणार असल्याचेही त्यांनी सांगितेले होते.
दरम्यान, संध्याकाळी कोणताही गेस्ट त्यांच्याकडे आला नाही. याची चौकशी करण्यासाठी कर्मचारी खोलीत गेल्यानंतर मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्याठिकाणी तरुणाचा मृत’देह दोरीला लटकलेला अवस्थेत होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
प्राथमिक पाहाणीत सर्व घटना ही आत्म.हत्या असल्याचे दिसून येत होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृत’देह ताब्यात घेतला. याबाबत पोलीस अधिकारी दविंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे दाम्पत्य आले होते ते पती-पत्नी होते. त्यांच लग्न ६ महिन्यापुर्वी झाले होते. घरगुती वादातून या तरुणाने आत्मह’त्या केल्याचे प्राथमिक तपासत आढळले आहे.
दरम्यान, या तरुणाच्या पत्नीची माहिती मिळालेली नाही. पवन कुमार असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबातील लोकांच्या चौकशीत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. पोलीस घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
प्रेयसीला पळवून नेण्यासाठी आला, आणि तिच्या आईलाही पळवले
‘पुरुष नेत्याशी संपर्क असला तरच महिला नेत्यांना उमेदवारीचं तिकीट मिळतं’
‘विरुष्का’च्या मुलीचा पहिलावहिला सुपरक्यूट फोटो व्हायरल; कमेंन्ट्सचा पाऊस