पोटच्या पोरीला मारून दांपत्याने स्वतः केली आत्महत्या, घटनेने राज्यात खळबळ

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कर्जाला कंटाळून व्यापारी कुटुंबाने मुलीचा खून करून स्वतः आत्महत्या करून जीवन संपविले. केडगावमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लहान मुलीचा यामध्ये समावेश आहे.

संदीप यांचे नगर-दौंड महामार्गावर औषधाचे दुकान होते. त्यांचे २००८ किरण हिच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना मैथिली ही मुलगी होती. सगळे काही सुरळीत सुरू असताना मात्र त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका कंपनीची जिल्ह्याची एजन्सी घेतली होती.

ते जिल्ह्यातील किराणा दुकानांना साहित्य पोहच करत होते. मात्र कोरोना काळात त्यांच्यावर आर्थिक संकट आले. लॉकडाऊनमध्ये त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. यामुळे ते तणावात होते. भाड्याच्या घरात ते राहत होते. त्यांनी नातेवाईक, मित्र परिवाराला फोन केले. आणि हा धक्कादायक निर्णय घेतला.

त्यांनी मुलगी मैथिली हिला फाशी देऊन मारले. त्यानंतर संजय आणि किरण या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबत अजून तपास करत आहेत. यामागे अजून काय कारण आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

दार न उघडल्याने खिडकीतून आत बघितले असता त्यांचे मृतदेह दिसून आले. शेजारील रहिवाशांनी ही माहिती पोलिसांना दिली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवालीचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर हे घटनास्थळी आले. कर्जाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केले असल्याचे त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळून आले आहे.

ताज्या बातम्या

“नाव वाघ असलं म्हणून मांजर वाघ होत नाही अन् अशा ५६ चित्रा वाघ आल्या तरी मी त्यांना घाबरत नाही”

हैद्राबाद बलात्कार प्रकरण; सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांना अटक होण्याची शक्यता..

विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय, काळ जाईल तेव्हा बघू- शरद पवार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.