प्री-वेडिंग शूटसाठी गेलेल्या जोडप्यावर काळाचा घाला, पोझ देताना नदीत बुडून मृत्यू

हैदराबाद । सध्या अनेक ठिकाणी लग्नाच्या अगोदर जोडप्यांमध्ये प्री-वेडिंग शूट करणे ही एक प्रथाच पडली आहे. मात्र मैसूरमधील एका जोडप्यासाठी असाच एक प्री-वेडिंग शूट जीवघेणा ठरले आहे. शूटिंग दरम्यान या जोडप्याचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

कर्नाटकच्या तालकड येथील कावेरी नदीवर हे जोडपे प्री-वेडिंग शूट करत होते. मृत शशिकला आणि चंद्रू यांचे एका आठवड्यांपूर्वी साखरपूडा झाला होता. शशिकला आणि चंद्रू एक फोटोग्राफर आणि दोन नातेवाईकांसह मुदुकुदर येथील मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात गेले होते. तेथे दोन बोटींनी नदी पार करून दुसऱ्या बाजूला जात असताना हा अपघात झाला.

शशिकला, चंद्रू एक मच्छीमार आणि नातेवाईकांसह बोटीतून जात होते. त्याचवेळी कपलच्या नातेवाईकांनी फोटो शूट करण्यास सुरवात केली. ही बोट काही मीटरच्या अंतरावर गेली होती. तेवढ्यात पोझ देण्यासाठी जोडपं उभे राहिले आणि त्यांचे संतुलन बिघडून शशिकला पाण्यात पडली.

या सर्व गडबडीत चंद्रूच्या शशिकलाला वाचविण्याच्या प्रयत्नात बोट पलटी झाली. चंद्रू, मच्छीमार आणि एक नातेवाईक नदीत पडले. मच्छीमार नदीतून सुरक्षित ठिकाणी पोहचला, मात्र शशिकला आणि चंद्रु यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही बोट खराब झाली होती. मात्र या घटनेमुळे एकच धक्का या कुटुंबातील सदस्यांना बसला आहे. या जोडप्याचे लग्न एका महिन्यावर आले होते आणि ही घटना घडली. याबाबत पोलिस अजून तपास करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.