त्यांना लग्नात खूप अडचणी आल्या, त्यातूनच त्यांनी नवीन व्यवसाय सुरू करून केली करोडोंची कमाई

आज आम्ही एका कपलची सक्सेस स्टोरी सांगणार आहोत जे आज करोडो रूपये कमवत आहेत. त्यांचे नाव आहे आनंद शहानी आणि मेहक सागर. हे दोघे २०१० मध्ये एका इंटर्नशिपमध्ये हेल्थ न्युट्रिशन कंपनीत भेटले होते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

चार वर्षे त्यांनी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप ठेवली आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. आपल्या लग्नाचे नियोजन करत असताना त्यांना खुप अडचणी केल्या. या अडचणींमुळे त्यांना खुप त्रास सहन करावा लागला होता.

यानंतर याच्यातूनच त्यांना एक कल्पना सुचली. मग त्यांनी वेड मी गुड ही वेबसाईट सुरू केली. याच्यावरती ते लग्नासंबंधी ब्लॉग लिहीतात. आनंद यांनी अनुभव सांगताना सांगताना सांगितले की, आमच्या लक्षात आले की भारतात खरोखरच अशा वेडिंग ब्लॉगचा अभाव आहे.

ज्यावर लोक विश्वास ठेवतील आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. त्यामुळे आम्ही वेडिंग ब्लॉग या आयडियासह लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे जोडप्यांना लग्न करताना मदत व्हावी आणि जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

त्यामध्ये त्यांना लग्नामध्ये कोणकोणत्या गोष्टींची गरज पडते या सगळ्या गोष्टी आमच्या ब्लॉगवर वाचायला मिळतील. यामुळे लग्न झालेल्या जोडप्यांचे अनुभवही आपल्याला माहित पडतील. वेड मी गुड हे एक वेडिंग पोर्टल आहे.

जे आजकालच्या लोकांना विवाहाचे नियोजन करण्यासाठी मदत करते. मेहक यांनी सांगितले की आम्ही आधुनिकतेवर भर देतो. आमच्या वस्तु आजच्या पिढीसाठी बनविल्या गेल्या आहेत. वेड मी गुड लग्नासंबधितल्या सगळ्या सुविधा पुरवितात.

यामध्ये ब्रायडल मेकअप, मेहंदी, डेस्टिनेशन वेडिंगसाठीचे ठिकाण, त्याचे बुकिंग करणे, फोटोग्राफर निवडणे, केटरिंग सुविधा, कपडे डिझाइन करणे, लग्नपत्रिका तयार करणे अशा अनेक सुविधा हे दोघे पुरवतात.

सध्या बाजारात लग्नाच्या सुविधा देणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत कारण याला खुप मागणी आहे. त्यामुळे जर आपण काहीतरी वेगळे दिले तरच आपण या स्पर्धेत टिकून राहू शकतो असे ते दोघे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
धुणी भांडी करून मुलाला आईने शिकवले, आता मुलाने झोपडपट्टीतून गाठले थेट इंग्लंड, पण..
कसा काय रातोरात स्टार झाला एक साधारण जिंगल बनवणारा मुलगा, वाचा त्याची यशोगाथा
आश्चर्यकारक! कबूतरांचा सांभाळ करून सांगलीचा हा पठ्या कमावतोय लाखो रूपये
तुमचं तुम्ही बघून घ्या, अमेरीकेचा भारताला ठेंगा; लसीसाठी कच्च्यामालाची मागणी फेटाळली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.