“देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लसीकरण केले, पण कधी अशी चमकोगिरी केली नाही”

नवी दिल्ली । देशात कोरोना अजूनही सक्रिय आहे. यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले जात असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात २१ जून रोजी देशात तब्बल ८० लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे.

यामुळे मोदींनी ट्विरवरुन देशवासीयांचे अभिनंदन केले. त्यांनी ‘वेल डन इंडिया’ असे म्हटले. मात्र याबाबत एवढी जाहिरातबाजी का केली जातेय असेही सांगितले जात आहे. जाहिरातबाजी आणि बॅनरबाजीतून मोदी सरकारकडून स्वत:चे कौतुक होत आहे. त्यावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे.

याबाबत वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजीही करण्यात आली आहे. त्यावरुनच, काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले, पण कधी अशी चमकोगिरी केली नाही.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात एका दिवसात १७ कोटी मुलांना पोलिओचा डोस देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी ना पोस्टर्स होते, ना मोठा प्रचार. कारण उद्देश जीव वाचवण्याचा होता, स्वत:ची प्रतिमा चमकावण्याचा नाही!, असे म्हणत काँग्रेसने मोदींच्या लसीकरणातील जाहीरातबाजीवर टीका केली आहे.

याबाबतचे ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेअर केले आहे. यामुळे आता भाजपकडून काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यापीठ आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी याबाबत विविध विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना संदेश पाठवले आणि मोदींचे आभार व्यक्त करणारे फलक सोशल मीडियावरील शैक्षणिक संस्थांच्या वेबपेजवर प्रसिद्ध करावेत, असे सांगितले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मान्यताप्राप्त डिझाईन हे हिंदी आणि इंग्रजी भाषेतून उपलब्ध असेल आणि ते सोशल मीडियाला जोडावे. या डिझाईनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून ‘धन्यवाद पीएम मोदी’ असा आशयही लिहिण्यात आला आहे. यामुळे हे प्रकरण तापले आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक! बँकेत मास्क न घातल्यामुळे सुरक्षारक्षकाने ग्राहकाला घातली गोळी

शेतकऱ्याने शोधली कांदा साठवण्याचा एक अनोखी पद्धत; दोन वर्ष एकही कांदा होणार नाही खराब

सुनीताची शेती पद्धती काही निराळीच! घराच्या अंगणात शेती करून कमावते लाखो रूपये; जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.