‘मी देशसेवा केली, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही’, जवानाचा आक्रोश

कोरोनामुळे सध्या देशात अनेकांचे जीव जात आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. देशात आलेली दुसरी लाट खुप भयानक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताचे खूप मोठे नुकसान केले नाही.

अनेकांना याचा त्रास होत आहे, फक्त सर्वसामान्यच नाही तर देशसेवा करणारेही या परिस्थितीत हतबल झाले आहेत. आता कारगिल युद्धातील हिरो सुभेदार मेजर (निवृत्त) हरी राम दुबे यांना कोरोनामुळे आपला मुलगा गमवावा लागला आहे.

त्यांनी आपल्या ३१ वर्षीय मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी कित्येक तास वाट पहावी लागली असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, मी १९८१ ते २०११ पर्यंत आपल्या मातृभूमीची सेवा केली. कारगिल ते बारामुल्ला, लडाख ते लुकुंग येथे मी कर्तव्य बजावले आहे.

ते म्हणाले, त्यांनी बारामुल्ला येथे दहशतवाद्यांना ठार केले आणि पाकिस्तानविरोधात लढा दिला. पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही. मंगळवारी संध्याकाळी त्याचे कोरोनाने निधन झाले. ही दुःखद घटना त्यांनी सांगितली आहे.

मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी हरी राम दुबे यांना आपली पत्नी, मुलगी आणि सुनेसोबत कित्येक तास वाट पहावी लागली. शेवटी त्यांना पीपीई किट घालून मृतदेह पाहण्याची परवानगी देण्यात आली.

त्यांच्या कामाबद्दल लष्कर प्रमुखांकडून प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान झाला होता, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही आणि आता कागदपत्रांसाठी पळवत आहेत. माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे आणि ही वागणूक म्हणजे छळ आहे, असे हरी राम दुबे यांनी सांगितले आहे.

यामुळे ही खूप भयानक गोष्ट आहे, मात्र कोरोना महामारीने अनेकांवर ही वेळ आली आहे. अनेकांना तर आपल्या जवळच्या व्यक्तींना शेवटचे बघायला सुध्दा मिळाले नाही. यामुळे हे भयाण वास्तव आहे.

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी नाही देवदुत! ना बेडची कमी ना ऑक्सिजनची; नंदूरबारच्या कलेक्टरने करून दाखवलं

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हे आयुर्वेदीक औषध ठरतंय रामबाण उपाय; आयुष मंत्रालयाचा दावा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.