देश जळत असताना मोदींनी गाण्यावर धरलाय ठेका, विडिओ व्हायरल करत विरोधकांची टीका

दिल्ली । सध्या दिल्लीत कृषी कायद्या विरोधात आंदोलन पेटले आहे. यामुळे केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. दिल्लीत आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी दौऱ्यावर आहेत.

वाराणसीत देव दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला. मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनही घेतले. यावेळी छान रोषणाई करण्यात आली होती. पंतप्रधानांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नदीच्या किनाऱ्यावर उभे असून समोर मंदिरांना केलेली रोषणाई दिसून येत आहे.

भगवान शंकराचे गाणं मोठ्या आवाजात वाजत असल्याचे ऐकू येत असून मोदींनी या गाण्याच्या चालीवर ठेका धरल्याचे दिसून आले आहे. यावर आम आदमी पार्टीने या व्हिडिओमधील काही भाग एडीट करुन हा प्रकार म्हणजे २०२० मधील स्कॅम म्हणजेच घोटाळा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्कॅम १९९२ चे म्युझिक देत हा व्हिडिओ एडीट करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये दिल्लीमधील शेतकरी आंदोलनात झालेल्या लाठीमार केल्याचे व्हिडीओ दिसत असून त्यासमोर मोदींनी ठेका धरल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे. यावरून मोदींवर टीका करण्यात आली आहे.

दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलन पेटले आहे. केंद्र सरकार अजूनही शेतकऱ्यांशी चर्चा करत नाही. शेतकऱ्यांना मारहाण करण्यात येत आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.