खळबळजनक! ७७ टक्के मधामध्ये चायनीज सिरपची भेसळ, ‘या’ प्रसिद्ध कंपन्या मधात करतात भेसळ

दिल्ली | भारतात बऱ्याच घरात मधाचा वापर केला जातो. मधाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. मधमाशीपासून फुलांच्या रसापासून तयार होणाऱ्या मधाला अतिशय शुद्ध मानले जाते. परंतु यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ होत असून यामध्ये चीनचा खूप मोठा हात असल्याचे समोर आले आहे. CSE ने याबाबत खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वच मोठ्या मधाच्या ब्रँड्समध्ये भेसळ केली जात आहे. या भेसळीत डाबर, झंडू, बैद्यनाथ, पंतजली अशा बड्या कंपन्यांचे नाव समोर आले आहे. CSE नुसार या मधात मोठ्या प्रमाणात शुगर सिरपची भेसळ केली जाते जी आरोग्यासाठी खूप घातक आहे.

CSE च्या महासंचालक सुनीता नारायण यांनी सांगितले की, हा रिपोर्ट भारत आणि जर्मनीच्या प्रयोगशाळा झालेल्या एका अध्ययनावर आधारित आहे. तपास केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यादरम्यान ७७ टक्के नमुन्यांमध्ये शुगर सिरपची भेसळ आढळली आहे. आणि हे सिरप चीनची कंपनी अलीबाबा कडून मागवले जात आहे. या चाचणीत १३ पैकी ३ ब्रँड पास झाले आहेत. भारतीय मानकांद्वारे अशा प्रकारची भेसळ पकडणे सोपे काम नाही.

परंतू चीनी कंपन्या अशा प्रकारचे शुगर सिरप तयार करतात जे सहज पकडले जाऊ शकते. ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे असे सुनीता नारायण म्हणाल्या आहेत. कोरोनापासून बचावासाठी अद्याप कोणतेही ठोस औषध आलेले नाही.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भारतीय मधाचे सेवन करत आहेत. अशात भेसळयुक्त मधामुळे लठ्ठपणा आणि वजन वाढू शकते. जेवणात साखरेचे प्रमाण वाढू शकते. ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

CSE च्या चाचण्यांमध्ये पतंजली, डाबर, झंडू आणि एपीस हिमालय यांसारखे मोठे ब्रँड फेल झाले आहेत. केवळ सफोला, मार्कफेड सोहना आणि नेचर्स नेक्टर हे मध सर्व चाचण्यांत पास झाले आहेत.

भेसळीसाठी गोल्डन सिरप, इन्व्हर्ट शुगर सिरप आणि राईस सिरपचा वापर केला जातो जे चीनमधून मागवले जाते. अलीबाबा या चीनी कंपनीने दावा केला आहे की, त्यांचे फ्रुकटोज सिरप हे सर्व भारतीय चाचण्यांना पास करते.

महत्वाच्या बातम्या-

सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले..

“भाजपच्या नटीने मुंबईला ‘पीओके’ म्हटले, आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांला राज्याच्या विकासासाठी मुंबईत यावे लागले”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.