कार, मोटरसायकल चालवण्याचा खर्च होणार ३५ रुपये प्रति लीटरपर्यंत कमी, नितीन गडकरींची माहिती

नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनके नागरिक बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे मोठे हाल होत आहेत. अशा भयानक परिस्थितीमध्ये पट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, आता वाहन चालकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आता खर्च ३५ रुपये प्रति लीटरपर्यंत कमी होणार आहे.

इंधनांच्या वाढत्या किंमतींच्या काळात हा निर्णय झाला आहे. याचे कारण आहे फ्लेक्स फ्युएल इंजिनच्या वापराला मंजुरी दिली तर गाड्या पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉल या इंधनावर चालतील आणि फ्लेक्स फ्युएल इंजिनचा वापर सर्व कंपन्यांना बंधनकारक होईल. सरकार येत्या ८ ते १० दिवसांमध्ये फ्लेक्स फ्यूएल इंजिनबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

एका कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले, मी परिवहन मंत्री आहे, मी इंडस्ट्रीला एक आदेश देणार आहे की फक्त पेट्रोल इंजिने असणार नाहीत, फ्लेक्स फ्यूएल इंजिनही असतील. जिथे लोकांकडे पर्याय असेल की ते १०० टक्के कच्च्या तेलाचा वापर करू शकतील किंवा १०० टक्के इथेनॉलचा वापर करू शकतील.

या इंधनावर चालतील आणि फ्लेक्स फ्यूएल इंजिनचा वापर सर्व कंपन्यांना बंधनकारक होईल. ते पुढे म्हणाले, की ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्स फ्यूएल इंधनाचे उत्पादन करत आहेत. या देशांमध्ये ग्राहकांना १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के बायोइथेनॉल वापरण्याचा पर्याय दिला जात आहे.

ते म्हणाले की सध्या प्रति लीटर पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉल मिसळले जाते. जे प्रमाण २०१४ साली १ ते १.५ टक्के होते. इथेनॉलची खरेदीही ३८ कोटी लीटरपासून वाढून ३२० कोटी लीटरपर्यंत पोहोचली आहे. गडकरी यांनी पुढे सांगितले की इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा कित्येक पटींनी चांगले इंधन आहे. आणि यामुळे प्रदूषण होत नाही. तसेच ते स्वदेशी आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेलाही यामुळे चालना मिळणार आहे, कारण आपल्याकडील अतिरिक्त खाद्यान्न आणि उसाचा रस वापरून इथेनॉलचा ज्यूस तयार केला जाऊ शकतो. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आयातीबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी पेट्रोलसह २० टक्के इथेनॉल मिसळण्यासाठी २०२५चे लक्ष्य दिले होते. मात्र हा निर्णय खरंच झाला तर अनेक वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.

ताज्या बातम्या

करिश्माचा मोठा खुलासा म्हणाली, करिनापेक्षा सलमान माझ्याशी जास्त….

पंगा गर्लची हुशारी! कंगनाने ‘या’ दिग्दर्शकाला चित्रपटातून काढले बाहेर, म्हणाली…

लग्नाच्या ९ दिवसानंतर सासरी आलेली मुलगी झाली गायब, नंतर प्रियकरासोबत भेटली ‘या’ अवस्थेत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.