Share

दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रात ५० कोटींचा भ्रष्टाचार; अण्णासाहेब मोरेंच्या विरोधात पुराव्यानिशी तक्रार दाखल

नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिंडोरी मधील प्रसिद्ध स्वामी समर्थ केंद्रांचे(Swami Samarth Kendra) प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यावर तब्बल ५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वामी समर्थ केंद्राचे धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. (Corruption of Rs 50 crore at Swami Samarth Kendra in Dindori)

अमर पाटील यांनी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्याविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अमर पाटील यांनी तक्रार दाखल करत असताना काही पुरावे देखील पोलिसांसमोर सादर केले आहेत. अमर पाटील यांनी पुरावा म्हणून ऑडिट रिपोर्ट दिला आहे. यामुळे स्वामी समर्थ केंद्रांचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे सध्या दिंडोरी परिसरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या ठिकाणी प्रसिद्ध स्वामी समर्थ केंद्र आहे. या केंद्राशी निगडित असणारी अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ ही एक धर्मादाय संस्था आहे. स्वामी समर्थ केंद्रांचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे या धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष आहेत.

देशभरातील असंख्य भाविक दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्रांच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची स्वामी समर्थ केंद्रांवर नितांत श्रद्धा आहे. स्वामी समर्थ केंद्रांचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे शिष्य देखील संपूर्ण देशभरात पसरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी समर्थ केंद्रांचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी इतर सदस्यांशी मिळून संस्थेत अपहार केल्याचा आरोप अमर पाटील यांनी केला आहे.

अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ संस्थेचे अध्यक्ष गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी संस्थेमध्ये ५० कोटी ६८ लाख ६९ हजार २२१ रुपये इतक्या रकमेचा भ्रष्टाचार केला असल्याची माहिती अमर पाटील यांनी दिली आहे. संस्थेच्या अध्यक्षांनी एक कोटी ४४ लाख ९३ हजार ५६० रुपये बँकेत जमा केले नाहीत, उलट इतर कारणांसाठी ते पैसे वापरले, असे अमर पाटील यांनी तक्रारीत म्हंटले आहे.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षांनी धर्मादाय आयुक्तांचे नियम डावलले असल्याचा आरोप अमर पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडून मागवला असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“हे शिवलिंग नसून कारंज्याचा मधोमध तुटलेला दगड”, व्हायरल व्हिडिओवर काँग्रेसच नेत्याचं विधान
काशीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलेले शिवलिंग नेमके आहे तरी कसे? पहा व्हिडिओ
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करणे भाजप नेत्यांना पडले महागात; पोलिसांची कठोर ॲक्शन

राज्य क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now